वढु बुद्रुकला उधोबा पॅनेलचा विजयी चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:12 IST2021-01-20T04:12:10+5:302021-01-20T04:12:10+5:30

वढू ग्रामपंचायतीवर गेली वीस वर्षे उधोबा महाराज पॅनेलची सत्ता आहे. यंदाही ती सत्ता राखत त्यांनी विजयी चौकार लगावला आहे. ...

Wadu Budrukala Udhoba panel's winning four | वढु बुद्रुकला उधोबा पॅनेलचा विजयी चौकार

वढु बुद्रुकला उधोबा पॅनेलचा विजयी चौकार

वढू ग्रामपंचायतीवर गेली वीस वर्षे उधोबा महाराज पॅनेलची सत्ता आहे. यंदाही ती सत्ता राखत त्यांनी विजयी चौकार लगावला आहे.

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप नेते व माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्या नेतृत्वाखालील श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व राखले. श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.

विजयी उमेदवारांत श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलचे हिरालाल जगन्नाथ तांबे, राहुल मारुती ओव्हाळे, अनिल भाऊसाहेब शिवले, ज्ञानेश्वर हरिभाऊ भंडारे, कृष्णा दत्तात्रय आरगडे, अंजली प्रफुल शिवले, सारिका अंकुश शिवले, सुरेखा सोनेश शिवले, संगीता शांताराम सावंत आदींचा समावेश आहे.

श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलमध्ये अनिल जनार्दन भंडारे, शिलावती धनंजय भंडारे, अनिता नितीन भंडारे व रोहिणी विजय भंडारे आदींचा समावेश आहे.

माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्या पत्नी अंजली प्रफुल्ल शिवले यांनी विरोधी उमेदवार संध्या जालिंदर भंडारे यांचा १७६ मतांनी पराभव केला तर माजी सरपंच अंकुश शिवले यांच्या पत्नी सारिका शिवले यांनी स्वाती संजय सावंत यांचा ३६५ विरोधी मतांनी पराभव केला तर व अनिल भंडारे यांनी गोरख शिवले याचा २८० मतांनी पराभव केला.

--

फोटो क्रमांक : १९ कोरेगाव भीमा वढू बुद्रूक ग्रामपंचायत

फोटो : श्री क्षेत्र वढूू बुद्रुक (ता.शिरुर) येथे श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलच्या विजयाचा जल्लोश करताना नवनिर्वाचीत सदस्य

Web Title: Wadu Budrukala Udhoba panel's winning four