वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षकावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:06+5:302020-12-02T04:09:06+5:30

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे कामानिमित्त फलटण येथे गेले ...

Wadgaon Nimbalkar's firing on assistant police inspector | वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षकावर गोळीबार

वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षकावर गोळीबार

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे कामानिमित्त फलटण येथे गेले असता त्यांच्यावर गुंडांकडुन गोळीबार झाला.

सोमनाथ लांडे हे रविवारी काही कामानिमित्त फलटण येथे गेले होते. यावेळी काही अज्ञान गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. लांडे यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या बाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता ते कामानिमित्त फलटण या ठिकाणी गेले असून आम्हाला जास्त कल्पना नसल्याचे सांगितले. याबाबत बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

Web Title: Wadgaon Nimbalkar's firing on assistant police inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.