वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे ठरले ‘स्टेशन आॅफ दि मंथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:16 IST2021-03-04T04:16:38+5:302021-03-04T04:16:38+5:30

ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अभिनव देशमुख यांनी पोलिसांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त सुधारणा घडवून लोकाभिमुख सेवा देण्याच्या ...

Wadgaon Nimbalkar Police Station named 'Station of the Month' | वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे ठरले ‘स्टेशन आॅफ दि मंथ’

वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे ठरले ‘स्टेशन आॅफ दि मंथ’

ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अभिनव देशमुख यांनी पोलिसांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त सुधारणा घडवून लोकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या बक्षीस योजनेतील एक महत्त्वाची संकल्पना असलेले ‘पोलीस स्टेशन आॅफ द मंथ’ म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातून संपूर्ण महिन्यामध्ये विविध कामकाजात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस ठाण्याची निवड करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. या योजनांतर्गत माहे डिसेंबर २०२० मध्ये वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे सोमनाथ लांडे (सहायक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन) यांनी व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील इतर पोलीस अधिकारी, व पोलीस अंमलदार यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक, इतर कमीत कमी कालावधीत जास्त गुन्हे तपास, गुन्हे निर्गती, चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करणे, बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई, विविध गुन्ह्यातील तपासात जप्त किंमती मुद्देमाल फिर्यादिस परत देणे, वेळेत पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणांची निर्गती, गुन्हेगारीस आळा यासारख्या प्रकारात चांगली कारवाई कारवाई केलेने माहे डिसेंबर २०२० महिन्याचा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कारसाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याची निवड झालेली आहे. हा पुरस्कार मनोज लोहिया (पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र) यांचे हस्ते व डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मिलिंद मोहिते (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण) यांच्या उपस्थितीत वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे यांचे वतीने पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे स्वीकारला आहे.

फोटो ओळी : स्टेशन आॅफ दि मंथ हा मनाचा पुरस्कार स्वीकारताना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोउनि योगेश शेलार.

०२०३२०२१-बारामती-०८

Web Title: Wadgaon Nimbalkar Police Station named 'Station of the Month'