वडगाव कांदळी विवाहितेची आत्महत्या सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:14 IST2021-08-24T04:14:09+5:302021-08-24T04:14:09+5:30

याप्रकरणी विवाहितेचा नवरा अमोल पवार, सासरा आनंता हरिभाऊ पवार, सासू कमल पवार, दीर प्रवीण पवार, जाऊ ...

Wadgaon Kandali married woman commits suicide | वडगाव कांदळी विवाहितेची आत्महत्या सात जणांवर गुन्हा दाखल

वडगाव कांदळी विवाहितेची आत्महत्या सात जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी विवाहितेचा नवरा अमोल पवार, सासरा आनंता हरिभाऊ पवार, सासू कमल पवार, दीर प्रवीण पवार, जाऊ निर्मला प्रवीण पवार, सुप्रिया नितीन पवार, चुलत सासरे भिकाजी हरिभाऊ पवार (सर्व राहणार वडगाव कांदळी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ताटे म्हणाले की, वडगाव कांदळी येथील संदीप वसंत पाचपुते यांची मुलगी नेहा व अमोल यांचा विवाह मार्च २०२० मध्ये झाला होता. विवाहानंतर आरोपींनी नेहा हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नेहा १९ ऑगस्ट २०२१ रोजी घरातून बेपत्ता झाली होती. शनिवारी( ता.२१) नेहा हिचा मृतदेह त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आला. याप्रकरणी नेहाचे वडील संदीप पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार धनवे करत आहेत.

Web Title: Wadgaon Kandali married woman commits suicide