वाडा जेथे जावयाने केली सासू-सासऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:09 IST2021-07-05T04:09:04+5:302021-07-05T04:09:04+5:30

गोविंद वसंत घोलप (रा. वाकी खुर्द, ता. खेड) असे मारहाण करणाऱ्या जावयाचे नाव आहे. याबाबत सासू कांता काशिनाथ गायकवाड ...

Wada where Javaya beat up his in-laws | वाडा जेथे जावयाने केली सासू-सासऱ्यांना मारहाण

वाडा जेथे जावयाने केली सासू-सासऱ्यांना मारहाण

गोविंद वसंत घोलप (रा. वाकी खुर्द, ता. खेड) असे मारहाण करणाऱ्या जावयाचे नाव आहे. याबाबत सासू कांता काशिनाथ गायकवाड (वय ५४, रा. वाडा, ता. खेड) यांनी घोलप यांच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांचे जावई गोविंद घोलप हे त्यांच्या घरी गेले होते. कांता गायकवाड यांची सून पायल हिला घरातील लोकांचे काही ऐकू नकोस, त्यांना धाकात घे, काही करत नाहीत ते, मी पाहतो काय करायचे ते, यांच्या घराची कशी वाट लावतो, असे जावई गोविंद सांगत असल्याने सांगत असल्याने जावई तुम्ही तिला असे का सांगताय? असा जाब कांता गायकवाड यांनी गोविंद यांना विचारला. या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करून सासरा काशिनाथ गायकवाड यांच्या डोक्यात, हातावरे तसेच तोंडावर लाकडी चौरंगाच्या पायाने मारले. यात काशिनाथ यांचा हात तुटला. गायकवाड यांचा मुलगा तुषार व मुलगी तृप्ती हे भांडणे सोडविण्यास गेले असता त्यांनाही गोविंद याने हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कांता गायकवाड यांचे केस धरून भिंतीवर जोरात ढकलून दिल्यामुळे त्यांचे या घटनेत दात तुटले. यामुळे त्यांनी गोविंद यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गोविंद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Wada where Javaya beat up his in-laws