शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीच्या शाळेला देशातील पहिल्या झिरो एनर्जी शाळेचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 18:28 IST

पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणली होती. त्याच शाळेने आता देशातही नावलौकिक मिळविला आहे.

ठळक मुद्देबँक आॅफ न्यूयॉर्कच्या मदतीमुळे ८ झिरो-एनर्जी क्लासरूम तयारराज्य सरकारने इंटनॅशनल स्कूलमध्ये वर्गीकृत करून प्रस्तावित केला ‘पिसा’ अभ्यासक्रममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार आठही वर्गखोल्यांचे उद्घाटन

धनंजय गावडेशिक्रापूर : ग्रामस्थांची साथ, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि त्याला समाज दानशूर व्यक्तींच्या मदत यांच्या सहकार्यातून कायापालट होऊ शकतो. त्यासाठी आवश्यक असते इच्छाशक्ती. शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा एक उत्तम उदाहरण आहे. पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्यातील जिल्हा परिषद शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणली होती. त्याच जिल्हा परिषद शाळेने आता देशातही नावलौकिक मिळविला आहे. देशातील पहिला झिरो-एनर्जी शाळा झाली आहे. बँक आॅफ न्यूयॉर्कच्या मदतीमुळे वर्षभरापूर्वी बांधायला सुरू केलेल्या ८ झिरो-एनर्जी क्लासरूम नुकत्याच तयार झाल्या आहे. ही परदेशातील सुसज्ज आणि हायटेक शाळेची जाणीव होते. या शाळेने ५ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्याला चकित केले होते. स्थानिक ग्रामस्थांची एकसारखी प्रेरणा हेच ते काय बळ असलेल्या या शाळेला राज्य सरकारने इंटनॅशनल स्कूलमध्ये वर्गीकृत करून या शाळेत ‘पिसा’ अभ्यासक्रम प्रस्तावित केला आहे. तो येत्या जूनपासून सुरू होतोय. शाळेच्या दर्जात्मक कामाची दखल घेऊन मागील मार्चमध्ये अमेरिकेची ट्रेझरी-बँक बँक आॅफ न्यूयॉर्कने आठ वर्गखोल्या उभ्या करून दिल्या. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यामातूनही या कामास अर्थसाह्य लाभले.या बांधकामात नवीन प्रकारच्या पूर्णत: काचेच्या २२ फूट रुंद, २२ फूट लांब तसेच १४ फूट उंचीच्या ८ वर्गखोल्या पूर्ण पर्यावरणपूरक आहेत.पॉलिकार्बोनेट व टेनसाईल मेंब्रेन यांचे द्विस्तरीय छत, टफन ग्लासच्या भिंती (१, ५०० अंश सेल्सिअस तापमानाला या काचेचे मजबुतीकरण केले जाते) असे या प्रत्येक रूमचे बांधकाम असून चारही बाजूंनी ५ फुटांचे पन्हाळ छत प्रत्येक वर्गाला उभे केले आहेत. छताचा पहिला स्तर टेन्साईल मेम्ब्रेन (निरुपयोगी प्लॅस्टिकपासून बनविलेले मटेरियल)चा असून त्यामुळे प्रकाश स्वीकारणे व उष्णता परावर्तित हे दोन्ही साध्य होते. त्याखालील स्तर हा पॉलिकार्बनचा असून पॉलिकार्बनच्या रासायनिक संरचनेमुळे प्रकाशाचे विस्तारीकरण होत असल्याने वर्गखोलीत थंड, उल्हसित व उबदार प्रकाश प्रत्येक वर्गखोलीत मिळत आहे. मुख्याध्यापक दत्तात्रय वारे म्हणाले, की आठही वर्गखोल्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात शहरी वातावरणयुक्त व जागतिक स्पर्धेशी तुलना करणारे शिक्षण कसे दिले जाईल, याचा आराखडा तयार करून १५ आॅगस्ट २०१२ रोजी या प्रकल्पाचा ठराव  ग्रामसभेत मांडला व ३५० लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांनी वाबळेवाडीत आधुनिक शिक्षण संकुल उभे केले आहे. 

  • राज्यातील पहिली टॅबलेट शाळा 
  • इंटरनॅशनल पिसा अभ्यासक्रम 
  • देशातील पहिली झिरो-एनर्जी शाळा-विविध विषयांच्या प्रयोगखोल्या सुसज्ज
टॅग्स :Shikrapurशिक्रापूरShirurशिरुरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे