शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मतदानाची मिळतेय पोहोच पावती; पुणे शहर निबंधक कार्यालयाने केला तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:24 IST

शहर उपनिबंधक कार्यालयाने व्हीव्हीपीएटी या यंत्राद्वारे दोन सहकारी संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडल्या असून, त्यात मतदानाबाबत कोणतीही तक्रार झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशहर उपनिबंधक कार्यालयाने या यंत्राद्वारे दोन सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडल्या यशस्वी हे यंत्र ईव्हीएम यंत्राप्रमाणेच असून, कोणाला मतदान केले याची पावतीच येते मतदाराच्या हाती

पुणे : गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनवर (इव्हीएम) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कोणालाही मत दिल्यास ते विशिष्ट पक्षालाच जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केली होता. त्यामुळे मताची पावती मतदाराला मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत होती. तसे तंत्रज्ञान असलेल्या यंत्राचा यशस्वी वापर शहर निबंधक कार्यालयाने केला आहे. शहर उपनिबंधक कार्यालयाने या यंत्राद्वारे दोन सहकारी संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडल्या असून, त्यात मतदानाबाबत कोणतीही तक्रार झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाजी नगर येथील पुणे डिव्हिजन इन्शुरन्स एजंट्स को-आॅप क्रेडीट सोसायटीचे ९ नोव्हेंबरला मतदान झाले. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे त्याचे कार्यक्षेत्र होते. या संस्थेची मतदारसंख्या ही ५ हजार इतकी होती. त्याची मतमोजणी दहा डिसेंबरला झाली. निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यात व्होटर व्हेरिफाईड पेपर आॅडीट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) या मतदान यंत्राचा वापर करण्यात आला होता. हे यंत्र ईव्हीएम यंत्राप्रमाणेच असून, त्यात कोणाला मतदान केले याची पावतीच मतदाराच्या हाती मिळते. त्यामुळे यंत्रावरील कोणतीही कळ दाबल्यावर विशिष्ट व्यक्ती अथवा चिन्हाच्या नावे मत जमा होते, असा आरोप करण्याचा प्रकार थांबला आहे. या पूर्वी ९ जुलै रोजी हमाल नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक अशाच पद्धतीने झाली होती. या संस्थेचे सुमारे ३ हजारांहून सभासद आहेत. याबाबत माहिती देताना शहर उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी म्हणाले, की सहकारी पतंसंस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्राचा वापर हा पुण्यातील एका पतसंस्थेत २०१५ रोजी झाला. जुलै आणि नोव्हेंबरमध्ये मतदान झाल्याची पावती देणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने मतदान झाले. पुणे डिव्हिजन इन्शुरन्स एजंट्स को-आॅपरेटीव्ह सोसायटीचे ५ हजार सभासद होते. या निवडणुकीच्या रिंगणात ३२ उमेदवार उभे होते. त्यामुळे तीन मतदान यंत्रे लावावी लागली. त्यासाठी तीन जिल्ह्यांत २० मतदानकेंद्रांवर मतदान घेण्यात आले. मार्केट यार्डातील हमाल भवनात १० डिसेंबरला त्याची मतमोजणी देखील झाली. जुलै पासूनचा हा दुसरा प्रयोग होता. आम्ही दिलेले मत दुसऱ्याच व्यक्तीला गेले अशी एकही तक्रार दाखल झाली नाही.    पुण्यात प्रथमच अशा तंत्राचा वापर करुन मतदान करण्यात आले. भोसरी येथील सिग्नल सर्किट या कंपनीच्या वतीने या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे