निवडणूक यंत्रणेने इव्हीएम मशीन परस्पर केल्या सील

By admin | Published: April 21, 2017 12:50 AM2017-04-21T00:50:47+5:302017-04-21T00:50:47+5:30

मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करून ठेवताना हॉल सील करताना त्यावर

Election machinery interconnect EVM machine sealed | निवडणूक यंत्रणेने इव्हीएम मशीन परस्पर केल्या सील

निवडणूक यंत्रणेने इव्हीएम मशीन परस्पर केल्या सील

Next

नरेश पुगलियांचा आरोप : अधिकाऱ्यांना निवेदन सादर
चंद्रपूर : मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करून ठेवताना हॉल सील करताना त्यावर उमेदवारांची सही घेणे आवश्यक असते; मात्र निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सह्या न घेता परस्पर मतदान यंत्र सील केले. यामुळे मतदानानंतरच्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणवार घोळ होऊ शकतो, अशी तक्रार काँगे्रसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरूवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
चंद्रपूर महानगर पालिकेसाठी १९ एप्रिलला मतदान पार पडले. मतदानानंतर केंद्रांवरील इव्हिएम मशीन सील करण्यात आल्या. मतदानाची प्रक्रिया सायंकाळी ६.३० पर्यंत चालली. त्यानंतर बहुतेक केंद्रांवरील मशीन उपस्थित उमेदवारांच्या अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने सील न करता परस्पर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हा कमेटीचे अध्यक्ष गजाजनन गावंडे यांनी एका तक्रारीतून केला आहे.
मनपाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, तथा पाचही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात माहिती देताना नरेश पुगलिया म्हणाले, मतदानानंतर सर्व इव्हिएम मशीन जिल्हा क्रीडा संकूलाच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आल्या. मशीन ठेवलेल्या हॉलला सील करताना उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या घेवून मनपाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सील करायला हव्या.
त्यानंतर मतमोजणीच्या वेळी संबंधित उमेदवारांच्या समक्ष हे सील उघडले जावे, अशी पद्धत आहे. मात्र तसे न करता, हा हॉल सील करताना पाचही झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या एका रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर एका उमेदवाराच्या पतीची स्वाक्षरी घेवून सील करण्यात आले. ही पद्धत चुकीची असून यात गैरप्रकाराला वाव असल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी केला आहे.
या संदर्भात पुगलिया पुढे म्हणाले, यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत ही पद्धत पाळली गेली आहे. मात्र या वेळी बगल देण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यावर काँग्रसचे प्रचार उपप्रमुख देवेंद्र बेले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. मात्र त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे सूचविले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने मनपाच्या आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट घडली नाही. त्यांना देण्यासाठी लेखी निवेदनही घेवून काँगे्रसचे कार्यकर्ते गेले असता त्यांनी भेटच दिली नाही.
मतमोजणीच्या काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी आयुक्तांचीच राहील, असे पुगलिया या वेळी म्हणाले. वारंवार विनंती करूनही या गंभीर प्रकाराकडे लक्ष न देणे चुकीचे आहे. मतमोजणीत गैरप्रकार असल्याचे लक्षात आल्यास शहरात २४ तासात गंभीर परिणाम उमटतील, असा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला.
पत्रकार परिषदेला गावंडे गुरूजी, नंदू नागरकर, सुनिता लोढीया, प्रकाश इटनकर, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Election machinery interconnect EVM machine sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.