कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी आज मतदान

By Admin | Updated: January 11, 2015 00:47 IST2015-01-11T00:47:46+5:302015-01-11T00:47:46+5:30

कॅन्टोन्मेंटमधील विविध ८ वॉर्डांमध्ये नशीब आजमाविणाऱ्या ६८ उमेदवारांसाठी उद्या (रविवारी) सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होत आहे.

Voting for Cantonment election today | कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी आज मतदान

कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी आज मतदान

पुणे : कॅन्टोन्मेंटमधील विविध ८ वॉर्डांमध्ये नशीब आजमाविणाऱ्या ६८ उमेदवारांसाठी उद्या (रविवारी) सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होत आहे. ४९ मतदान केंद्रांची सज्जता त्यासाठी करण्यात आली असून, ४६ हजार ३३ मतदारांपैकी किती टक्के मतदान होणार, याविषयी औत्सुक्य आहे.
कॅन्टोन्मेंट निवडणूक कायद्यानुसार मतदानानंतर लागलीच मतमोजणी करण्याची सुविधा असल्याने रविवारी रात्री १० नंतर मतमोजणीस सुरुवात होऊन एक तासात निकाल जाहीर होऊ शकतील. संरक्षण मंत्रालयाने निवडणूक यंत्रणेला दिलेल्या सूचनेनुसार मतदाराला कोणालाही मतदान करावयाचे नसल्यास उपलब्ध असलेल्या नोटा या कळ सुविधेचा वापर करता येणार नाही.
दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी योग्य प्रमाणात पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला असून, स्थानिक जवान या निवडणुकीसाठी मतदार असल्याने गुजरात बटालियनचे दीडशे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असलेल्याच मतदारांची ओळख ग्राह्य धरण्यात येईल. (प्रतिनिधी)

विविध वॉर्डांमधील मतदारांची संख्या, केंद्रांची व उमेदवारांची संख्या
वॉर्ड क्र.१ /४६७९/५/५, वॉर्ड क्र.२/४६६३/५/९, वॉर्ड क्र.३/४९२३/६/१२, वॉर्ड क्र.४ /६७६८/७/९, वॉर्ड क्र. ५/४९९० /६/८, वॉर्ड क्र. ६/७३६३/ ७/४, वॉर्ड क्र.७/ ७६५३/८/११,
वॉर्ड क्र. ८/४९९६ /५/१०.

चोख बंदोबस्त
पुणे, खडकी आणि देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी होत असलेल्या मतदानासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीमंडल दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे आणि परिमंडल चारचे उपायुक्त मनोज पाटील यांच्या देखरेखीखाली ५०० पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डात ४९ व खडकीत ४७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आलेली आहेत.

बोर्डाच्या मतदार यादीत मतदारांची छायाचित्रे नसल्याने बनावट मतदान होण्याची शंका असून, एका मतदान केंद्रावर सातशे ते साडेसातशे मतदान असल्याने केंद्र अधिकाऱ्यांना विशेषत: स्थलांतरित व दुबार नावे असलेल्या मतदारांबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Voting for Cantonment election today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.