निरगुडसर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, शिंगवे; तसेच भीमाशंकर सह़ साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या ऊसतोडणी कामगारांना मतदानाविषयी जनजागृती करण्यात आल्याची माहिती आंबेगाव तालुका मतदान जनजागृती पथकाच्या प्रमुख नायब तहसीलदार सुषमा पैके करीयांनी दिली़जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे तालुक्यात राबविली जात आहे. या मोहिमेंर्तगत, आठवडे बाजारात; तसेच शाळा-महाविद्यालये, विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, कमीतकमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांच्या क्षेत्रामध्ये जनजागृती वीटभट्टी, ऊसतोडणी कामगार राहात असलेल्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांचा व महिला, तरुण यांचा सहभाग घेऊन दलितवस्ती, झोपडपट्टी भागात जनजागृती करण्यात येत आहे़ त्यासाठी तालुक्यात मतदान जनजागृती पथकाची स्थापना केली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक २०१७ आंबेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश भालेदार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध भागात मतदार जनजागृती केली जात आहे़ यावेळी मतदार राजा जागा हो़़़लोकशाहीचा धागा हो़़़ या घोषणेने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी जनजागृती पथकाचे सदस्य सुनील भेके, आत्माराम जगदाळे, काशिनाथ घोंगडे, भास्कर चासकर, सीताराम गुंजाळ, विजयकुमार शेटे, सुरेश रेंगटे, सावकार अरगडे, चंद्रकांत मडके, कैलास संभुदास, राहुल रहाटाडे, कृष्णा घुले, मुख्याध्यापिका विमल लोंढे, विजय वळसे, बाबाजी गाढवे, उत्तम वाव्हळ, सुजाता टेमकर, सुजाता थोरात, साखर शाळेचे मुख्याध्यापक बबन सोनावणे उपस्थित होते़(वार्ताहर)
ऊसतोडणी कामगारांत मतदान जागृती
By admin | Updated: February 15, 2017 01:49 IST