पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 01:06 IST2016-03-12T01:06:03+5:302016-03-12T01:06:03+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ (विद्यानगर) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १७ एप्रिलला मतदान होणार आहे.

Voting on April 17 for by-elections | पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान

पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ (विद्यानगर) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १७ एप्रिलला मतदान होणार आहे.
मार्च २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विद्यानगर या प्रभागातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक जगदीश शेट्टी हे जात दाखल्यामुळे अडचणीत आले. विभागीय जात पडताळणी समितीने शेट्टी यांचा जात दाखला अवैध ठरवला. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात आले. या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी २२ ते २९ मार्चदरम्यान नामनिर्देशन पत्रांचे वाटप केले जाणार आहे. ३० मार्चला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी १ एप्रिलला दुपारी तीनपर्यंत मुदत असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Voting on April 17 for by-elections