मतदान ६० टक्के
By Admin | Updated: January 28, 2015 23:37 IST2015-01-28T23:37:20+5:302015-01-28T23:37:20+5:30
जिल्हा परिषदेच्या दोन जागांच्या पोट निवडणुकीसाठी सरासरी ६० टक्के मतदान झाले. या दोन्ही निवडणुकीत विद्यमान आमदारांचा कस लागला

मतदान ६० टक्के
पुणे : जिल्हा परिषदेच्या दोन जागांच्या पोट निवडणुकीसाठी सरासरी ६० टक्के मतदान झाले. या दोन्ही निवडणुकीत विद्यमान आमदारांचा कस लागला असून, निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि.३०) जाहीर होणार आहे.
आमदार दत्तात्रय भरणे आणि सुरेश गोरे यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर-कळस गटासाठी ८ उमेदवार रिंगणात उतरले होते. येथे ५७.३६ टक्के मतदान झाले.
यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसकडून प्रतापराव पाटील तर काँगे्रसच्या वतीने प्रदीप विश्वासराव पाटील यांनी निवडणूक लढवली, मात्र विद्यमान आमदार भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते. तर खेड तालुक्यातील नाणेकरवाडी-चाकण गटासाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. नाणेकरवाडी-चाकण गटात ६५.१९ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)