व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने वाढले उमेदवार-मतदारांचे नाते

By Admin | Updated: February 18, 2017 02:21 IST2017-02-18T02:21:47+5:302017-02-18T02:21:47+5:30

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे सध्या निवडणुकीला चांगलाच रंग आणला आहे. सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या

Votersapp Group increased the number of candidates-voters | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने वाढले उमेदवार-मतदारांचे नाते

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने वाढले उमेदवार-मतदारांचे नाते

खोर : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे सध्या निवडणुकीला चांगलाच रंग आणला आहे. सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप हा प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून उमेदवार मतदारांच्या जवळ आले आहेत. दौंड तालुक्यातीलबऱ्याच गट व गणामध्ये फ्लेक्सबाजीवर जास्त भर न देता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
उमेदवारांकडून घरबसल्या मतरादारांना आपल्याला मिळालेले चिन्ह, कोणत्या बटणावरती कोणते चिन्ह आहे, कोणत्या वारी मतदान आहे अशा विविध प्रश्न-उत्तरांची देवाण-घेवाण होत आहे.
या रणधुमाळीत कोणता उमेदवार आपली ताकद दाखवेल, हे ठरविणे मतदारांना देखील कठीण होऊन बसले आहे. आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात या दोंघाचेदेखील वर्चस्व या जिरायती भागावरती केंद्रीत असल्याने कोणता उमेदवार बाजी मारेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.(वार्ताहर)

Web Title: Votersapp Group increased the number of candidates-voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.