पोलिसांच्या जीपमध्ये मतदार स्लिपा
By Admin | Updated: October 23, 2014 05:23 IST2014-10-23T05:23:13+5:302014-10-23T05:23:13+5:30
टायर फुटल्याने येथील पोलिसांच्या जीपला अपघात झाला. ही जीप उलटल्याने जीपमधील मतदारांच्या स्लीप बाहेर पडल्या.

पोलिसांच्या जीपमध्ये मतदार स्लिपा
सासवड : टायर फुटल्याने येथील पोलिसांच्या जीपला अपघात झाला. ही जीप उलटल्याने जीपमधील मतदारांच्या स्लीप बाहेर पडल्या. पोलिसांच्या जीपमध्ये या स्लिपा आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सासवड पोलीस स्टेशन येथे जीप (एमएच ४२ ए ६६३६) ही कार्यरत आहे. ही जीप आज (बुधवार) रोजी सकाळी सासवड नगरपालिकेसमोर सासवड-जेजुरी रस्त्यावर उलटली. एका गुन्ह्यातील आरोपीला घेऊन सासवडकडे येत असताना चालकाच्या बाजूचा पुढील टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला.
अपघातग्रस्त जीपमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पुरंदर-हवेलीच्या मतदारसंघातील काही पक्षांच्या मतदार स्लिपा आढळून आल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी मात्र याबाबत काहीही माहिती दिली नाही. जीपमधील तथाकथित वोटर स्लीप प्रकरणामुळे अनेक शंका - कुशंकांना उधाण आले आहे.