मतदारांनी हजर व्हावे
By Admin | Updated: November 26, 2014 23:50 IST2014-11-26T23:50:24+5:302014-11-26T23:50:24+5:30
अर्जदारांनी हरकती आणि छाननीवर होणा:या सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असा फतवा काढल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाज सोडून उपस्थित राहण्याची वेळ आली आहे.

मतदारांनी हजर व्हावे
पुणो : नव्याने नावनोंदणी केलेल्या 26क्क् मतदारांपैकी 26 आक्षेप आले असले, तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सर्वच अर्जदारांनी हरकती आणि छाननीवर होणा:या सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असा फतवा काढल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाज सोडून उपस्थित राहण्याची वेळ आली आहे.
पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक 1 ते 4 मधील अर्ज व हरकतींवर शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर रोजी, तर वॉर्ड क्रमांक 5 ते 8 मधील अर्ज व हरकतींवर शनिवार दि. 29 रोजी अध्यक्ष निर्णय देणार आहेत. 4क् हजारांहून अधिक मतदार असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वतंत्र मतदारयादीत मतदारांची छायाचित्रे नसल्याने काही गैरप्रकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
नव्या अर्जदारांनी भरलेल्या अर्जाच्या वेळी योग्य कागदपत्रंची मागणी व छाननी केली गेली असती तर सर्व अर्जदारांना पुन्हा बोलाविण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया एका मतदाराने व्यक्त केली.
कॅन्टोन्मेंट बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक 6 वर्षाच्या कालावधीनंतर होत असून, नागरिकांमध्ये या निवडणुकीविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नव्या मतदारांनी तसेच 6 महिन्यांपूर्वी कॅन्टोन्मेंट परिसरात वास्तव्यास आलेल्या नागरिकांनी उत्साहात वेळ खर्च करून नावनोंदणीचे अर्ज भरले. मात्र, आपले नाव यादीत समाविष्ट होणार की नाही याविषयी शंका आहेत. बोर्डाने ही नवी यादी जाहीर न करता तिचा समावेश मूळ यादीत करण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी आपले दैनंदिन कामकाज सोडून बोर्डात हजर राहण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)