मतदार यादी दुरुस्तीसाठी मुदत
By Admin | Updated: July 2, 2015 00:11 IST2015-07-02T00:11:34+5:302015-07-02T00:11:34+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डाची प्रारूप मतदार यादी एक जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना २० जुलैपर्यंत मुदत देण्यात

मतदार यादी दुरुस्तीसाठी मुदत
पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्डाची प्रारूप मतदार यादी एक जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या निवडणुकीच्या काळात मतदार यादीत नावे नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. दुबार आणि मृत मतदारांची नावे यादीमध्ये असल्याच्याही तक्रारी झाल्या होत्या.
बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक चित्रा गोखले म्हणाल्या, की बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेण्यात आली आहे. त्यावरून प्रारूप यादी बनविण्यात आली आहे. ही यादी एक जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रारूप यादी बोर्डाच्या मुख्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीत नावे समाविष्ट नसल्यास किंवा कोणतीही दुरुस्ती असल्यास हरकतींसाठी संबंधितांना २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या सक्षम अधिकाऱ्यासमोर सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर १५ सप्टेंबर रोजी अंतिम यादी तयार होणार आहे.
बोर्डाच्या परिसरातील लोकसंख्या ७१ हजार ७८१ आहे. निवडणुकीपूर्वी ४४ हजार ८३१ मतदारांनी मतदार यादीत नावे नोंदविली होती. निवडणुकीच्या निमित्ताने बोर्डाने नावे समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर अंतिम मतदार संख्या ४६ हजार ३३ झाली होती. आता यादी अद्ययावत करण्याचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. (वार्ताहर)