विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून चोरी

By Admin | Updated: July 7, 2017 03:05 IST2017-07-07T03:05:56+5:302017-07-07T03:05:56+5:30

वडकी (ता. हवेली) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून सात दानपेट्यांमधील रोख रकमेसह हार्मोनियम, ५ किलो वजनाची पितळी घंटा

Vitthal-Rukmini stolen from the temple | विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून चोरी

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून सात दानपेट्यांमधील रोख रकमेसह हार्मोनियम, ५ किलो वजनाची पितळी घंटा व स्वयंपाकाची शेगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना आज सकाळी ६. ३० वाजता उघडकीस आली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुजारी प्रमोद हरिश्चंद्र सारंग ऊर्फ बाबाजीमहाराज यांनी फिर्याद दिली आहे. हे मंदिर दिवेघाट वडकी येथे आहे. महाराज हे मंदिराच्या बाजूस असलेल्या एका खोलीत राहतात. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करण्यासाठी उठले, त्या वेळी त्यांना मंदिर आवारात ठेवण्यात आलेल्या सातही दानपेट्या उघड्या अवस्थेत व त्यांची कुलूपे कोणीतरी तोडलेली दिसली. महाराजांना चोरी झाल्याचा संशय आल्याने मंदिराच्या आवारातील पाहणी केली. तेथील साहित्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सात दानपेट्यांत एकूण किती रक्कम होती हे मात्र सांगता आले नाही.

Web Title: Vitthal-Rukmini stolen from the temple