शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर ते पंढरपूर ‘विठाई’ बससेवेचा प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:42 IST

राजगुरुनगर येथील राजगुरुनगर एसटी आगारातून बुधवारी (दि. २६) राजगुरुनगर ते पंढरपूर या आलिशान व आरामदायी एसटी बससेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

राजगुरुनगर : येथील राजगुरुनगर एसटी आगारातून बुधवारी (दि. २६) राजगुरुनगर ते पंढरपूर या आलिशान व आरामदायी एसटी बससेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या बसचे पूजन प्रवासी रोहिदास पाचारणे व याच गाडीचे चालक-वाहक यांच्या हस्ते करून बस मार्गस्थ करण्यात आली.या प्रसंगी कार्यशाळा अधीक्षक कुंडलिक बेंढाले, विठाई बसचे चालक प्रकाश राठोड, वाहक कालिदास चिखले, संदीप गावडे, सतीश दळवी, दिलीप चौधरी, विठ्ठल वनघरे अनिल मंडलिक आदी कर्मचाऱ्यांसह प्रवासी उपस्थित होते.अनेक वर्षांपासून राजगुरुनगर येथून दावडी, आळंदी मार्गे पंढरपूर अशी बससेवा सुरू आहे. या भागातून आळंदी मार्गे पंढरपूरला जाण्यासाठी अनेक वारकरी व भाविक नियमित या बससेवेचा वापर करीत असतात. तसेच, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी विविध गावांतून सुमारे सात ते आठ गाड्यांचे बुकिंग एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगारातून केले जाते. तसेच, याशिवाय वैयक्तिकरीत्याही अनेक भाविक या गाडीने पंढरपूरला प्रवास करण्यासाठी पसंती देतात. प्रवासी सेवेचा विचार करता व या मार्गावरील वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता, अत्याधुनिक स्वरूपातील ‘विठाई’ नावाच्या नवीन बससेवेचा प्रारंभ महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.या मार्गावर पूर्वीची चांगली चालणारी बस असलेल्या एसटी बसच्या स्वरूपात बदल करून ती अत्याधुनिक व अधिक आरामदायी आसनव्यवस्था व रंगरंगोटी करण्यात आली. आकर्षक स्वरूपात दिसणारी अशी बस या मार्गावर आजपासून सोडण्यात आली आहे. तसेच, या गाडीची उंचीही काही प्रमाणात वाढविण्यात आली आहे. सुमारे ५० प्रवासी आरामदायी पद्धतीने बसून या गाडीतून प्रवास करू शकतात. याशिवाय, अतिरिक्त वाढलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी वेगळ्या बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, या बसवर बाहेरील बाजूने पांडुरंग, वारकरी व वारकरी संप्रदायाच्या ध्वजाचे आकर्षक चित्र रेखाटलेले आहे, असे आर. जी. हांडे यांनी सांगितले.विठाई ही बस राजगुरुनगर, आळंदी, स्वारगेट, सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटणमार्गे पंढरपूरला जाईल. सकाळी ७.४५ वाजता ही बस राजगुरुनगर येथून सुटेल, तर दुपारी साडेचार वाजता पंढरपूर येथून राजगुरुनगरकडे मार्गस्थ होईल. तसेच, या बसचा तिकीट दरही साध्या बसप्रमाणेच (रु. ३४५) असेल. सर्व प्रकारच्या सवलतीच्या दरातील पाससह या बसमधून प्रवास करता येईल, असेही हांडे यांनी सांगितले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळPuneपुणे