शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्या ‘फ्लेमिंगो’ने बहरला उजनी जलाशयाचा परिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 00:02 IST

पर्यटकांची गर्दी : पर्यटनाला मिळाली चालना

पळसदेव : सोलापूर, पुणे, उस्मानाबाद अशा तीन जिल्ह्यांतील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या उजनीला हिवाळा आला की ओढ लागते ती युरोपीय पाहुण्यांची अर्थात पांढºयाशुभ्र डौलदार फ्लेमिंगोची. त्यामुळेच दरवर्षी न चुकता हे फ्लेमिंगोही हजारो मैलांचा प्रवास पूर्ण करत उजनीच्या जलाशयाच्या काठावर येतात आणि मग पांढºया धुक्यात हे पांढरे शुभ्र पक्षी एकरूप होऊन जातात. या पाहुण्यांचे रूप पाहण्यासाठी स्थानिक लोकांसह शेकडो किलोमीटरवरुन पक्षी व पर्यटन प्रेमी येतात. तशीच गर्दी यंदाही या पाहुण्यांना पाहण्यासाठी उजनी जलयाशयावर झाली आहे.

उजनी जलाशय परिसरात कुंभारगाव (इंदापूर) परिसर फ्लेमिंगो पक्षांच्या वास्तव्याचे प्रमुख ठिकाण. दरवर्षी युरोपीय प्रांतातून ‘फ्लेमिंगो’ पक्षी या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी येतात. परंतु, या वर्षी या पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत. शनिवारी व रविवारी या ठिकाणी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंभारगाव हे तर जणू फ्लेमिंगो पक्ष्यांचे माहेरघर झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले आहे. या ठिकाणी पक्षी पाहण्यासाठी दोन पॉइंट आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, सोलापूर, नगर ठाणे, कल्याण, डोंबिवली, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पर्यटक पक्षीमित्र, फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. पक्षी पाहण्याबरोबर माशाचे जेवण, तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकृती पाहावयास मिळत असल्याने पर्यटक खूष होतात.याबाबत ‘उजनी पार्क’ प्रमुख कुंडलिक धुमाळ यांनी सांगितले की, उजनीच्या या ठिकाणी जवळपास तीन हजार फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या आहे. या पक्ष्यांनी तीन गट केले आहेत. या पक्ष्यांबरोबर इतर ही जवळपास दोनशे जातीचे पक्षी आहेत. विशेषत: शनिवारी व रविवारी या ठिकाणी पक्षी पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. 

टॅग्स :Puneपुणे