शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

शिवनेरी किल्ल्यास विविध शाळांची भेट

By admin | Published: February 16, 2017 2:54 AM

स्वराज्याच्या निर्माणाची, वाट ही आडवळणाची. शत्रूसाठी संकटाची, शिवबासाठी अडथळ्याची. तरीही नाही डगमगले मावळे, राजासाठी

खोर : स्वराज्याच्या निर्माणाची, वाट ही आडवळणाची. शत्रूसाठी संकटाची, शिवबासाठी अडथळ्याची. तरीही नाही डगमगले मावळे, राजासाठी हाकेला धावले. कोठे कोठे हर हर महादेवाचा नारा घुमला, तेथे तेथे शिवनेरीच्या कडेकपारी, गनिमी काव्याच्या गाथा स्फुरल्या.या ओळीप्रमाणे गड, तटबंदी, माची, बुरुज, कडेलोट, जंगल, चिंचोळा रस्ता अशा पुस्तकातील अनेक शब्दांची उकल करण्याचा व हे याचि देही याचि डोळा दाखविण्यासाठी देऊळगावगाडा (ता. दौंड) केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पडवी, विठ्ठलवाडी, माळवाडी, देऊळगावगाडा, खोर येथील पाटलाचीवाडी, हरिबाचीवाडी, माळीमळा, देशमुखवाडी, दुर्गडे-बारवकरवस्ती या शाळांनी सहलीचे आयोजन करून शिवनेरीभेटीचा योगायोग लहान बालसैनिकांना करून दिला आहे.खांद्यावर भगव्या पताका घेऊन जय शिवाजी, जय भवानी, जय संभाजी, हरहर महादेव अशा घोषणांचा जयजयकार करीत चिमुकल्यांची आपली पावले राज्याच्या शिवाजीच्या जन्मस्थानाकडे गेली. या वेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांस किल्ल्यावरील लहान-मोठे कुंड, शिवजन्मस्थळ, तेथील पाळणा, कडेलोट टोक, तेथून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, शिवाईचे मंदिर, अंबरखाना याविषयीची प्रत्यक्षात माहिती देण्यात आली. गडावर बरोबरच अष्टविनायक मार्गातील लेण्याद्री, ओझर, भीमाशंकर या स्थळांना भेट देण्यात आली.सहलीचे आयोजन युवराज घोगरे, संदीप ढगे, शिवाजी वामन, प्रकाश कोंडे, शरद चांदगुडे, अनिता कोंडे, कावेरी बारवकर, शैला वाघ, सारिका दिवेकर, मनीषा चव्हाण, तानाजी तळेकर, मेधा रासकर, स्मिता झगडे, वृषाली बारवकर, अनिता शितोळे, सुभाष शिर्के यांनी केले होते.