कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना झाड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST2021-05-25T04:10:38+5:302021-05-25T04:10:38+5:30

वरवंड कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या पाहता या कुटुंबाने १०० झाडे कोविड सेंटरला भेट दिली आहे. या रुग्णाने आपल्या घरी ...

Visit the tree to patients after healing from corona | कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना झाड भेट

कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना झाड भेट

वरवंड कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या पाहता या कुटुंबाने १०० झाडे कोविड सेंटरला भेट दिली आहे. या रुग्णाने आपल्या घरी झाड लावून त्याचे योग्य प्रकारे संगोपन करणे आवश्यक आहे. यामुळे गावच्या निसर्गात भर पडेल व गावात ऑक्सिजन पुरवठा करणारी झाडे वाढतील. संजय जाधव, उपसरपंच प्रदीप दिवेकर, पोलीस पाटील किशोर दिवेकर, मारुती फरगडे, दत्तात्रेय दिवेकर, संजय पवार, दादा काळे, लक्ष्मण पंडित, सुभाष फासगे हे उपस्थित होते.

जाधव कुटुंबाची अशीही सेवा

गावातील कोरोनाबाधित रुग्णांना जर एचआरसीटी स्कॅन करावयाचे असल्यास व त्याच्याकडे पैसे नसतील तर त्याला मदत केली जाते व जे कोरोना योद्धा आहेत त्यांना त्यांच्या हॉटेलवर मोफत पार्सल जेवण दिले जाते.

वरवंड कोविड सेंटरमध्ये झाडे भेट देताना संजय जाधव.

Web Title: Visit the tree to patients after healing from corona