थायलंडच्या धर्मगुरूंची विहारास भेट
By Admin | Updated: January 30, 2017 03:00 IST2017-01-30T03:00:49+5:302017-01-30T03:00:49+5:30
गोडुंब्रे येथील कुशिनारा बुद्ध विहारास थायलंडचे धर्मगुरू आर्यवंगसो यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत थायलंडच्या माजी मंत्री सुपात्रा मदित

थायलंडच्या धर्मगुरूंची विहारास भेट
शिरगाव : गोडुंब्रे येथील कुशिनारा बुद्ध विहारास थायलंडचे धर्मगुरू आर्यवंगसो यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत थायलंडच्या माजी मंत्री सुपात्रा मदित, थंम्सॅट विद्यापीठाचे उपकुलगुरू नितीनंत विस्वेसन, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आदी उपस्थित होते.
मूळ बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीनुसार भारतात व महाराष्ट्रात घडवून आणणे. भारतीय बौद्धांना एक उच्च दर्जाचे जीवन जगण्यासाठी मदत करणे. इतर देशातील बौद्ध संघटनांबरोबर काम करून बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करणे. तसेच शांतता, न्याय, समता व बंधुता प्रस्तापित करण्यासाठी आणि महाराष्ट्रात बौद्ध धमार्चे केंद्र प्रस्थापित करण्यासाठी आयवंगसो भारतभ्रमण करत आहेत.
आयवंगसो खेडोपाडी जावून विहारांना भेटी देवून बौद्ध बांधवांशी संवाद साधत आहेत. त्यांचे कुशिनारा विहार व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विहारात उपस्थित बांधवांशी संवाद साधून विहारात वंदना घेण्यात आली. भारत हा शांतता प्रिय देश असून शांततेचा व सर्वधर्म समभावाचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
विहारास भेट देवून मन प्रसन्न झाले असल्याचेही आर्यवंगसो यांनी सांगितले. विहाराचे अध्यक्ष भारत आगळे, राजू आगळे, पोपट आगळे, मिलिंद आगळे, सजेर्राव गायकवाड, बाळासाहेब आगळे, आदी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)