लष्करप्रमुखांची लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट
By Admin | Updated: February 23, 2017 03:45 IST2017-02-23T03:45:59+5:302017-02-23T03:45:59+5:30
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला

लष्करप्रमुखांची लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट
पुणे : लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट देऊन आस्थापनांच्या सद्य:स्थितीची व कोणत्याही अनुचित प्रसंगाला तोंड देण्यासाठी सुसज्जतेची माहिती घेतली. त्यानंतर रावत यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. रावत हे सध्या पुण्यात मुक्कामी असून, गुरुवारी सकाळी ते दिल्लीला रवाना होतील, अशी माहिती लष्करातर्फे अधिकृत प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली. रावत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तसेच लष्करी तुकड्यांच्या सज्जतेचा आढावाही घेतला.