विसर्जन घाट; पुणेकर असुरक्षित
By Admin | Updated: September 1, 2014 17:07 IST2014-09-01T05:10:25+5:302014-09-01T17:07:25+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळील फरासखाना येथे १० जुलैला बॉम्बस्फोट झाला

विसर्जन घाट; पुणेकर असुरक्षित
शहराच्या मध्यवर्ती भागातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळील फरासखाना येथे १० जुलैला बॉम्बस्फोट झाला. कमी दर्जाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटनेचा तपास लागला नाही. त्यानंतरही गणेशोत्सवासाठी महापालिकेने कमी दर्जाचे अॅनॉलॉग कॅमेरे बसविण्याची निविदा राबविली. बॉम्बस्फोटाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव विसर्जनावेळी घाटावर दक्षता म्हणून शासनाच्या आदेशानुसार आयपी बेस्ड सीसीटीव्ही उभारणे अपेक्षित होते. अन्यथा अॅनॉलॉग कॅमेऱ्यांमुळे मिळणारे छायाचित्र अस्पष्ट दिसते. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास वर्षभरानंतरही लागलेला नाही. त्यावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व अधोरेखित होते.
राज्य शासनाचे आयपी बेस्ट सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश महापालिकेच्या विद्युत विभागाने धाब्यावर बसविले. अन् कमी दर्जाच्या अॅनलॉग कॅमेऱ्याचा घाट घातला आहे. त्यावर सजग नागरिक मंचाने आक्षेप घेऊन निविदा रद्द करण्याची मागणी महिनाभरापूर्वी केली होती. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने अॅनालॉग कॅमेरे बसविण्याची निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यावरून महापालिका प्रशासनाची पुणेकरांविषयीची संवेदनशीलता दिसून येते.