‘एक्स्प्रेस वे’वर व्हिजिलन्स कॅमेरे

By Admin | Updated: November 27, 2014 01:49 IST2014-11-27T01:49:09+5:302014-11-27T01:49:09+5:30

मुंबई- पुणो ‘एक्स्प्रेस वे’वरील भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत आह़े चालकाचे नियंत्रण सुटून वाहने रस्त्याच्या बाजूच्या बॅरिकेटला धडकण्याचे प्रमाण वाढले आह़े

Viscins Cameras on 'Express Way' | ‘एक्स्प्रेस वे’वर व्हिजिलन्स कॅमेरे

‘एक्स्प्रेस वे’वर व्हिजिलन्स कॅमेरे

>पुणो : मुंबई- पुणो ‘एक्स्प्रेस वे’वरील भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत आह़े चालकाचे नियंत्रण सुटून वाहने रस्त्याच्या बाजूच्या बॅरिकेटला धडकण्याचे प्रमाण वाढले आह़े भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यास रस्ते विकास महामंडळाकडून आता महामार्गावर व्हिजिलन्स कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत.
‘एक्स्प्रेस वे’वर वाहनांच्या वेगाला 8क् किमीची मर्यादा आह़े तरीही अनेक वाहने 1क्क् - 12क् किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावतात. त्यात वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतात. सातत्याने अपघात होणा:या 7 ते 8 ठिकाणी आता व्हिजिलन्स कॅमेरे बसविण्यात येतील. त्यामुळे वाहनांचा वेग समजू शकेल. वेगाने धावणा:या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. एक वर्षात कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होईल, असे महामंडळाचे कार्यकारी अभियंता अ़ प्रा़ अॅब्रोल यांनी सांगितले.
भरधाव वेगाने धावणा:या वाहनांचे याआधी टायर फुटून अपघात होण्याचे प्रकार मोठे होते. त्यावर उपाय म्हणून महामार्ग पोलिसांनी भरधाव वाहनांवर कारवाई सुरू केली. खालापूर टोलनाक्यावरून एखादे वाहन रवाना झाल्यानंतर ते उर्से टोलनाक्याचे 5क् किमीचे अंतर किती वेळात कापते, त्यावर त्याची वेग मर्यादा कळते. त्यानुसार याआधी भरधाव वाहनांवर कारवाई केली जात होती़ (प्रतिनिधी)
 
या स्पीड गनवर वाहनांचा वेग कळतो़ वेगमर्यादा ओलांडणा:या वाहनांवर टोलनाक्यांवर कारवाई करण्यात येत आह़े सध्या दररोज सरासरी 5क् ते 6क् वाहनांवर कारवाई केली जात असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितल़े 

Web Title: Viscins Cameras on 'Express Way'