शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संघटनेशी वींरेंद्रसिंह तावडेचा संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 8:23 PM

सीबीआयने १० जून २०१६ ला कॉ़. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी वीरेेंंद्रसिंह तावडेला अटक केली होती.

ठळक मुद्देवीरेेंंद्रसिंह तावडेला जामीन दिल्यास पुराव्यांवर दबाव येण्याची शक्यता, जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एका संघटनेचे नाव तपासात समोर आले आहे. या संघटनेशी सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हा संबंधित असल्याचा युक्तीवाद शुक्रवारी तावडेच्या जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी पक्षाकडून करण्यात आला.     अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ़. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात तावडे यांचा जामीन विशेष न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी फेटाळून लावला आहे. यापूर्वीही तावडेचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. वीरेद्रसिंह तावडे, विनय पवार, सारंग अकोलकर आणि इतरांच्या मदतीने  दाभोलकरांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाल्याने दोन वर्षापूर्वी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात, संत लोकांविरुद्ध, देवाबद्दल अनुद्गार काढतात, चमत्काराला आव्हान देतात़, आदींंमुळे त्याची हत्या करण्यात आल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले होते.              सीबीआयने १ जून २०१७ रोजी तावडे याच्या पनवेल येथील घरी तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता़. सीबीआयने १० जून २०१६ ला कॉ़. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तावडेला अटक केली होती. याप्रकरणी विविध साक्षीदारांचे साक्षीपुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले संशयितांचे फोटो, रेखाचित्रे, वीरेेंंद्रसिंह तावडे याच्या घरी व सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मुलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे असलेली हार्ड डिक्स जप्त करण्यात आल्या होत्या.       याप्रकरणात गेली दोन वषार्पासून तावडे हा अटकेत असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या बोलण्यात तफावत आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही अद्याप जप्त करण्यात आली नाही. उच्च न्यायालयाने त्याच्या आरोप निश्चितीसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे तावडे यांना जामीन देण्यात यावी अशी मागणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केली. जामीनाला विरोध करताना विशेष सरकारी वकील मनोज चलाडन यांनी युक्तीवाद केला की, यापूर्वीही तावडेचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन मिळावा यासाठी कोणतेही ठोस कारण नाही. तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणात समोर आलेल्या एक संघटनेशी तावडेचा संबंध आहे. त्यामुळे त्याचा गौरी लंकेश यांच्या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. तावडेला जामीन दिल्यास पुराव्यांवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने तावडेचा जामीन फेटाळून लावला आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरेGauri Lankeshगौरी लंकेश