वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’
By Admin | Updated: February 2, 2015 00:23 IST2015-02-02T00:23:47+5:302015-02-02T00:23:47+5:30
पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’च आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत सहजरीत्या कोणीही पोहोचू शक

वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’
सोमेश्वरनगर : पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’च आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत सहजरीत्या कोणीही पोहोचू शकते. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशीच अवस्था येथील आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हे चित्र दिसून आले.
पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण व माळशिरस या तालुक्यातील शेकडो गावांना पाणीपुरवठा करणारे नीरा नदीवरील वीर हे ९ टीएमसी पाणी क्षमता असणारे धरण आहे. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली या ठिकाणची भौगोलिक परिस्थितीत पाहून राज्य सरकारने हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाखो एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेती सुजलाम् सुफलाम् झाली आहे. मात्र, आज याच वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’ आहे.
धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत जायचे असल्यास कोणीही परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. मात्र, तुम्हाला जर वीर धरणापर्यंत तुम्ही खुशाल जाऊ शकता. लोणंदपासून शिरवळच्या दिशेने निघाले असता, लोणंदपासून १० ते १२ किलोमीटरवर हे वीर धरण लागते. या ठिकाणी धरणाच्या भिंतीवरील मुख्य गेट आहे. या ठिकाणावरून धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत जाता येते. धरणाची ही सुरक्षितता अचंबित करणारी आहे.