शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
3
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
4
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
5
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
6
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
7
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
8
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
9
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
10
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
11
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
12
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
13
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
14
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
15
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
16
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
17
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
18
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
19
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
20
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवता येणार पारंपारिकतेसह आधुनिक संगीताची ‘विरासत’; कर्वेनगरमध्ये रंगणार मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 11:58 IST

रक्ताच्या नात्यातील गुरू-शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अद्भुत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे.  

ठळक मुद्देमिराज क्रिएशन्स आयोजित, राहुल रानडे यांची संकल्पना८ ज्येष्ठ कलावंताचे एकाच व्यासपीठावर एकत्रितपणे होणार सादरीकरण

पुणे : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये गुरु-शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरू आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरू-शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अद्भुत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे.  मिराज क्रिएशन्स आयोजित, राहुल रानडे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेली ‘विरासत’ ही अनोखी संगीत मैफल येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता महालक्ष्मी लॉन्स, डी.पी. रस्ता, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे होत आहे. यात रक्ताचे नाते असण्याबरोबरच गुरु-शिष्य असे नाते असलेल्या सुप्रसिद्ध अशा ८ ज्येष्ठ कलावंताचे एकाच व्यासपीठावर एकत्रितपणे सादरीकरण होणार आहे. त्यामधे ग्रॅमी पुरस्कारविजेते प्रसिद्ध घट्टम् वादक  विक्कू विनायकराम व त्यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि ज्येष्ठ वादक तौफिक कुरेशी व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन हे सुप्रसिद्ध बंधू; शिवाय प्रसिद्ध वादक लुई बँक्स-जिनो बँक्स ही पिता-पुत्रांची जोडी, कर्नाटकाचे प्रसिद्ध व्हायोलीनवादक गणेश- कुमरेश हे दोघे भाऊ असले तरी त्यांच्यात गुरू-शिष्य नाते आहे, अशा कलावंतांचा समावेश आहे. निवेदनातही ही विरासत जपण्यात आली असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन ही पिता-पुत्रांची जोडी करणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे