पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST2021-05-07T04:11:18+5:302021-05-07T04:11:18+5:30
बारामती : बारामती शहरात भाजपच्यावतीने पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा निषेध नोंदविण्यात आला. याबाबत तहसील कार्यालयाला भाजप ...

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा
बारामती : बारामती शहरात भाजपच्यावतीने पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा निषेध नोंदविण्यात आला. याबाबत तहसील कार्यालयाला भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत निषेध नोंदविला.
येथील भाजपच्या कार्यालयासमोर त्याविरोधात निदर्शने करण्यात आली. बंगालमध्ये तृणमूलकडून सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूलकडून हल्ले केले जात आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला हिंसाचार ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या वेळी भाजप शहराध्यक्ष सतीश फाळके, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, गोविंद देवकाते, ज्ञानेश्वर माने, रघुनाथ चौधर आदी उपस्थित होते.
------------------------
फोटोओळी—बारामतीत भाजपकडून पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
०६०५२०२१बारामती—०१