आवश्यक तेथे हिंसाही करावी लागते

By Admin | Updated: January 25, 2017 02:10 IST2017-01-25T02:10:55+5:302017-01-25T02:10:55+5:30

अहिंसेचे तत्त्वज्ञान जिवंत ठेवायचे असेल तर आवश्यक तेथे हिंसाही करावी लागते, हा संदेश भगवद्गीतेने दिला आहे, असे उद्गार

Violence also needs to be done wherever necessary | आवश्यक तेथे हिंसाही करावी लागते

आवश्यक तेथे हिंसाही करावी लागते

पुणे : अहिंसेचे तत्त्वज्ञान जिवंत ठेवायचे असेल तर आवश्यक तेथे हिंसाही करावी लागते, हा संदेश भगवद्गीतेने दिला आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मंगळवारी येथे काढले.
विनय पत्राळे यांनी लिहिलेल्या ‘भगवद्गीता सर्वांसाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे मराठी ग्रंथालयाच्या प्रांगणात जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
प्रकाशक अनघा घैसास, ग्रंथालयाचे अध्यक्ष मुकुंद अनगळ, कार्याध्यक्ष धनंजय बर्वे, बाळासाहेब कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, व्यासपीठावर होते.
विनय पत्राळे यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका विषद करताना सांगितले, की सर्वांना उपयोगी अशी सूत्रे गीतेमध्ये आहेत. देशातील एक टक्काही लोकांना संस्कृत समजत नसल्याने सोप्या भाषेत हा ग्रंथ लिहिला.
डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी स्वागत केले. धनंजय बर्वे यांनी प्रास्ताविक के ले.
(प्रतिनिधी)

Web Title: Violence also needs to be done wherever necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.