शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी विनोबा भावे आग्रही : मिलिंद बोकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 20:02 IST

विनोबा भावे यांच्या मते विज्ञानच जीवनाचा मुख्य भाग व जगण्याचा पाया असतो..

ठळक मुद्देथोर स्वातंत्र्य सेनानी आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त व्याख्यान

पुणे :  स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले जयप्रकाश नारायण यांना सुद्धा आचार्य विनोबा भावे यांनी विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले होते. विनोबा भावे यांच्या मते विज्ञानच जीवनाचा मुख्य भाग व जगण्याचा पाया असतो. मनुष्याची प्रगती विज्ञानामुळेच झाली आहे. प्रत्येकाच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. संकटसमयी न डगमगता केलेली कृती ही अहिंसाच असते असे त्यांचे विचार होते, असे मत प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी व्यक्त केले.थोर स्वातंत्र्य सेनानी आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त मुलांच्या पेरूगेट भावे स्कूलमध्ये विनोबा भावे : एक उत्तम शिक्षक या विषयावर बुधवारी बोकील यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ अ. ल. देशमुख होते. बालसाहित्यिक राजीव तांबे, भावे शाळेचे प्राचार्य रोहिदास भारमळ, संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, मुकुंद तेलीचेरी उपस्थित होते.बोकील म्हणाले,आचार्य विनोबा भावे यांची ओळख केवळ महात्मा गांधी यांचे शिष्य एवढ्यापूर्ती मर्यादित नाही. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही विनोबा भावे यांचे कार्य खूप मोठे आहे. श्रमाकडे त्यांनी प्रतिष्ठा म्हणून बघितले. ते चांगले गणिती होते. त्यांचा विज्ञानावर विश्वास होता. अहिंसा, हिंदुत्व याविषयी विनोबा भावे यांचे काय मत होते, याविषयीची काही उदाहरणे बोकील यांनी दिली. आचार्य विनोबा भावे मजेदार शिक्षक होते, असा उल्लेख करुन देशवासियांना जय जगत हा मंत्र दिल्याचे बोकील यांनी नमूद केले.अ. ल. देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात विनाबा भावे यांची वाचनाची आवड, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि आत्मविश्वास या गुणांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विनोबा भावे यांच्यावर त्यांचे आजोबा व आईचा प्रभाव होता हे सोदाहरण स्पष्ट केले.राजीव तांबे यांनी विनोबा भावे यांच्या आश्रमातील आठवणी सांगितल्या. सुरुवातीस संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. प्राचार्य रोहिदास भारमाळ यांनी उपक्रमाचे कौतुक करुन भविष्यात सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.निकिता मोघे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेVinoba Bhaveविनोबा भावेscienceविज्ञान