शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा - विनय हर्डीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:14 AM

मराठी माणसाला मागे वळून पाहायला आवडते, पुढे नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा, असे परखड मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.

पुणे -  मराठी माणसाला मागे वळून पाहायला आवडते, पुढे नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा, असे परखड मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा (२०१८) पारितोषिक वितरण समारंभ विनय हर्डीकर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मसापचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते.या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’ ‘ग्राहकहित’ या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक’ ‘वाघूर’ या दिवाळी अंकाला, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘अक्षरधारा’ या दिवाळी अंकाला, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘दक्षता’ या दिवाळी अंकाला, त्याचबरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘बिगुल’ या दिवाळी अंकाला, ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक’ ‘विद्यार्थी’ या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘चपराक’ या दिवाळी अंकातील विद्या बायास ठाकूर यांच्या ‘सुमी’ या कथेला तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘कलासागर’ या दिवाळी अंकातील शिरीष पदकी यांच्या ‘ग्रीक सॅलेड व ग्रेसच्या कविता’ या लेखाला विनय हर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.तसेच दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचविणे हे वितरक आणि विक्रेत्यांचे योगदान लक्षात घेऊन पूनम एजन्सी, संदेश एजन्सी, रोहिणी बुकडेपो, उत्कर्ष आणि रसिक या प्रमुख विक्रेते व वितरकांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.वि. दा. पिंगळे यांनीप्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. उद्धवकानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.दिवाळी अंक व्यापक व्हायला हवाहर्डीकर म्हणाले, दिवाळी अंक ही केवळ साहित्यिकांची मिरासदारी नाही. साहित्याचे वर्तुळ मर्यादित आहे, ते व्यापक होणे गरजेचे आहे. दिवाळी अंकात लेखक बांधिलकी म्हणून लिहितात, संपादक बांधिलकी म्हणून अंक काढतात या पलीकडे जाऊन अर्थकारणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.जोशी म्हणाले, दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकांत तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहीत असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे