विमानतळाविरोधात गावे एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:26+5:302021-02-05T05:11:26+5:30

शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ लोकमत न्यूज नेटवर्क भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यात नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात ...

Villages rallied against the airport | विमानतळाविरोधात गावे एकवटली

विमानतळाविरोधात गावे एकवटली

शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क

भुलेश्वर ;

पुरंदर तालुक्यात नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्याची जागा निश्चित झालेली नाही. विमानतळ बाधित क्षेत्रात पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना असल्याने या ठिकाणचा शेतकरी ऊसशेती पिकवू लागला आहे. सोन्यासारख्या जमिनीवर विमानतळाचे भूत बसल्याने पुरंदरच्या पूर्व भागातील शेतकरी हैराण झाला आहे. याविरोधात येथील गावे एकत्र आले असून जमिनी न देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रजासत्ताक दिनाला नायगाव, पांडेश्वर येथे ही बैठक होणार आहे. जमीन न देण्याचा एकमुखी ठराव ही गावे करणार आहेत.

पुरंदर विमानतळाविरोधात येथील गावे एकवटली आहे. कितीही किंमत मोजावी लागली, तरी विमानतळ होऊ देणार नाही, असा बैठकीत निर्णय करुन विमानतळ विरोधी घोषणा देण्यात आल्या. हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दिवसेंदिवस पुरंदर तालुक्यातील नियोजीत विमानतळ वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, मावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी पुरंदरच्या पूर्व भागातील गावोगावी बैठका घेण्यात येत आहेत. व विमानतळाला विरोध केला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे विमानतळ होऊन द्यायचे नाही. जमिनी द्यायच्या नाहीत या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.

पुरंदर तालुक्यातील नियोजित सात गावांतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेत बदल करून पूर्व भागातील रिसे, पिसे, पांडेश्वर व आसपासच्या परिसरात विमानतळ हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी नायगाव व पांडेश्वर येथे ग्रामस्थांनी बैठकीचे नियोजन केले आहे. यावेळी विमानतळ आमच्याकडे नकोच, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. आमच्या वडिलोपार्जित जमिनी जबरदस्तीने विमानतळासाठी बळकावून आम्हाला भकास करू नका. असा सूर येथील शेतक-यांनी लावला आहे.

आज होणार सर्व गावांची बैठक

२६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पूर्व भागातील विमानतळबाधित सर्व गावांची बैठक नायगाव येथील सिध्देश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच या बैठकीला सर्व गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना बोलवणे. व त्यांची विमानतळ विषयी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचे ठरले आहे.

चौकट

बागांना बसणार फटका

पांडेश्वर येथील जवळ जवळ सातशे एकरावरती ऊस शेती आहे. त्याचप्रमाणे डाळिंब, सीताफळ, पेरु, इत्यादी फळांच्या बागा आहेत. यामुळे तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या बागायती जमीनी जाणार आहेत.

चौकट

पुरंदर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असे शासनाने पूर्वीच जाहीर केले विविध परवानग्या देखील मिळविल्या. पॅकेजही जाहीर केली. पण आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या शेतक-यांची जमीन जाणार आहे, त्या शेतकऱ्यांशी अद्यापही शासनाने चर्चा देखील केली नाही. रिसे पिसे परिसरात विमानतळ गेल्यास प्रवेशद्वार बारामती तालुक्यात व पुरंदर मध्ये काटेरी कुंपण यामुळे हे विमानतळ होऊ न देण्याच्या माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे शेतकरीवर्गाचा नियोजित विमानतळास विरोध वाढला आहे.

५) तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र नायगावचा शिद्धेश्वर व पांडेश्वर येथील शिवमंदिर याच भागात आहे. ६)२६ जानेवारी रोजी सर्व गावच्या नायगाव येथील एकञीत विमानतळ विरोधी बैठकीत सर्वच पक्षाचे राजकिय पुढारी काय निर्णय घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. फोटो ओळ : १) नायगाव येथे विमानतळाला विरोध दाखविताना ग्रामस्थ २) पांडेश्वर येथे विमानतळास विरोध दाखविताना ग्रामस्थ

Web Title: Villages rallied against the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.