करोनाला रोखण्यासाठी गांवो गांवी आरोग्य पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:45+5:302021-03-15T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोर : तालुक्यात कोरोन पुन्हा डोकेवर काढले आहे. तालुक्यात एका महिन्यात करोना बाधितांचा संख्या ५५ झाली ...

करोनाला रोखण्यासाठी गांवो गांवी आरोग्य पथके तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : तालुक्यात कोरोन पुन्हा डोकेवर काढले आहे. तालुक्यात एका महिन्यात करोना बाधितांचा संख्या ५५ झाली आहे. ज्या गांवात आणि भोर शहरात करोना बाधित आढळत आहेत तेथे भोर पंचायत समिती वैद्यकिय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात येत असून नागरीकांची आरोग्य तपासणी केली जात असल्याचे भोर तालुका पंचायत समितीचे गट विककास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगीतले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन योग्य त्या उपाय योजना करत असून नागरीकांचे प्रबोधन करत आहे. भोर तालुक्यात आज आखेर करोना बाधितांची संख्या २ हजार १६४ झाली आहे. यातील २ हजार १२३ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या ५५ करोना बाधितांवर उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड केंद्रात तर भोर शहरातील रथखाना आणि नसरापुर येथील सिद्धि विनायक रूग्णालयातील कोव्हिड उपचार केंद्रात उपचार केंद्रात करण्यात येत आहे. लोकांना काळजी घेऊन नियमांचे पालन करावे. भोर शहरात आज पर्यंत ४२० करोना बाधित रुग्ण आढळले असून उपचारानंतर ३८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. वर्षभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील १२ हजार ९६८ जणांचे स्वँब तपासले आहेत. ७९ जणांचा करोनाने बळी घेतला असुन शासनाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या नागरीकांकडून सुमारे ४ लाख ५० हजारांचा दंड वसुल करण्यात आला असल्याचे विशाल तनपुरे यांनी सांगीतले.
चौकट
करोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेवून भोरचा आठवडे बाजार शहाराच्या बाहेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भरवण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसिलदार अजित पाटील यांनी घेतला आहे. धार्मिक सौथळै, मंदिरे, मंगल कार्यालये,गावातील यात्रांवर नियंत्रण ठेऊन ५० पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहु नये म्हणून बंधन घालण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघण करणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.