कृषी योजनांच्या माहितीसाठी गावागावांत घोंगडी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:09+5:302021-02-05T05:06:09+5:30
याप्रसंगी मंडळ कृषि अधिकारी श्रीकांत राखु़ंडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वस्ताद दौंडकर, गूळ उत्पादक चंद्रकांत मोहिते, संदेश दौंडकर, संतोष ...

कृषी योजनांच्या माहितीसाठी गावागावांत घोंगडी बैठक
याप्रसंगी मंडळ कृषि अधिकारी श्रीकांत राखु़ंडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वस्ताद दौंडकर, गूळ उत्पादक चंद्रकांत मोहिते, संदेश दौंडकर, संतोष गायकवाड, कृषिमित्र अंकुश दौंडकर, मिलिंद मोहिते, कुंडलिक लांडे, ज्ञानेश्वर कराळे, विश्वास इंगळे, अशोक सोनवणे, अतुल दौंडकर, सत्यावान मोहिते आदी शेतकरी उपस्थित होते.
"विकेल ते पिकेल" मध्ये बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीवर भर देणे, शेतमाल विक्रीसाठी ब्रँन्ड विकसित करणे, शेतकऱ्यांची शेतीशाळा घेणे, पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी क्राॅपसेप प्रणाली वापरणे आदी बाबींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'विकेल ते पिकेल' अभियान, संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्याेग योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी नंदू वाणी यांनी केले. कृषि सहायक मंगेश किर्वे यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : ०१ शेलपिंपळगाव घोंगडी बैठक
फोटो ओळ : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे घोंगडी बैठक घेऊन शेतकऱ्यांना माहिती देताना कृषी विभाग अधिकारी.