शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

विकास आमटे, कौशिकी चक्रवर्ती यांना पु.ल. सन्मान जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 01:27 IST

पुलंच्या नावाने सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे दिल्या जाणाऱ्या कृतज्ञता सन्मानाने यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांना गौैरवले जाणार आहे.

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष ८ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यंदा ग्लोबल पुलोत्सव ‘सबकुछ पु. ल.’ असा असणार आहे. पुलंच्या नावाने सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे दिल्या जाणाऱ्या कृतज्ञता सन्मानाने यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांना गौैरवले जाणार आहे. पटियाला घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौैशिकी चक्रवर्ती यांना यंदाचा तरुणाई सन्मान जाहीर करण्यात आला आहे.पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित ग्लोबल या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मानाची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, मयूर वैद्य, गजेंद्र पवार, मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल, प्रसाद मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.यंदा १७ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणारा पुलोत्सव चित्रपट महोत्सव, मान्यवरांचे सन्मान, दृकश्राव्य कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद, अभिवाचन आविष्कार, संगीत मैफल, नाटक, नृत्य, कविता वाचन, एकपात्री कार्यक्रम, भाषणे, व्यंगचित्र प्रदर्शन, दृश्यफिती अशा अनेकविध कार्यक्रमांनी नटणार आहे. महोत्सव पहिल्यांदाच सबकुछ पु.ल. असणार असून, पुलंवरील तसेच पुलंच्या संबंधातील सुमारे १६ कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. पुलोत्सव बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व कलादालन, अर्काइव्ह थिएटर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या ठिकाणी पार पडेल. ग्लोबल पुलोत्सवामध्ये यंदा सुमारे ५० कार्यक्रमांची रेलचेल आहे.

टॅग्स :Puneपुणे