शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यादिवशी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साह्याने ठेवणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 00:47 IST

जिल्हाधिकारी नवल किशोर राम : कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही; ११ ठिकाणी वाहनतळ

कोरेगाव भीमा : १ जानेवारी रोजी परिसरातील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया नागरिकांसाठी ११ ठिकाणी पार्किंग व इतर भौतिक सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेची हमी प्रशासनावर असतानाच संपूर्ण गर्दीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही, असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी व्यक्त केला. यासोबतच या परिसराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी साांगितले.

१ जानेवारीला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया नागरिकांच्या सुख-सुविधांची पाहणी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक (ता. शिरूर) या ठिकाणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, गजानन टोणपे, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, गटविकास अधिकारी संदीप जठार, कोरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे, वढू बुद्रुकच्या सरपंच रेखा शिवले, रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष माऊली भोसले, श्रीमंत भोसले आदी उपस्थित होते.नवल किशोर राम म्हणाले, ‘सोशल मीडियावर आलेल्या प्रक्षोभक मजकुरांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला कळवून परिसरात शांतता ठेवण्यास मदत करावी. मानवंदनेसाठी येणाºया बांधवासांठी ११ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, बसने अंतर्गत वाहतूक, १५० पाण्याचे टँकर, १० किलोमीटर अंतरावरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेºयांसह ड्रोन कॅमेºयानेही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच अग्निशमन, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत कोणत्याही फलकात वादग्रस्त मजकूर आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. १ व २ जानेवारीला झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानीत ७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून ६ कोटींपेक्षा जास्त नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. याबरोबरच आणखी मदत देणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, ‘स्वराज्यात अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन शिवरायांनी लोकशाही मूल्ये जपली. त्याचप्रमाणे शंभुराजांच्या त्यागाने पावन झालेल्या भूमीत जनतेकडून चुकीच्या गोष्टी त्याग करण्याची अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली. या वर्षी सर्वाधिक पोलीस बंदोबस्त कोरेगावात प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाला स्थानिक मदतीसाठी गावात शांतिदूत तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.समाजकंटकांना तडीपार करूपरिसरात सामाजिक स्थैर्य व कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असतानाच जातीय तणाव निर्माण करणारांवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष असून समाजात तेढ निर्माण करणाºया समाजकंटकांना तडीपार करू, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला.विकास आराखडा अंतिम टप्यातपेरणे, कोरेगाव भीमासह वढू बुद्रुक परिसराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात असून येथील पाणी, रस्ते याबरोबरच परिसराचा विकास करण्यासाठी बांधकाम विभागाने आराखडा तयार करण्याचे कामा अंतिम टप्प्यात असल्याने या ठिकाणी ७० ते ८० कोटी रुपयांची विकासकामे लवकरच मार्गी लागतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.यावेळी ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडताना १ व २ जानेवारीला झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे पंचनामे होऊनही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच नागरिकांना संरक्षण देण्याचेही सांगितले.त्याचबरोबर १ जानेवारीला मानवंदना देण्यासाठी येणाºया बांधवांचे स्वागत करणार असल्याचीही हमी यावेळी दिली. वादग्रस्त मजकूर टाकणाºया फ्लेक्सवर कारवाई करण्याचीही मागणी यावेळी केली. गावात सलोखा असून कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे सांगत पोलिसांकडूनही स्थानिकांत विश्वास व सुरक्षेची हमी मागण्यात आली.गोविंद गोपाळ यांच्या समाधीस्थळावर पाणी, विजेची मागणी ग्रामस्थांनी केली. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणे