शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवारांकडे दूरदृष्टी पण आत्मकेंद्री राजकारणामुळे ते मागे पडले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:36 IST

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांचा घणाघात...

बारामती (पुणे) : बारामतीचा विकास म्हणजे शहराचा विकास आहे का, तालुक्यातील ३९ गावे अद्याप पाण्याविना आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसी त्यांनी घरावर काळे झेंडे फडकावले होते. पंतप्रधानांसह मोठे नेते आणत शहर व परिसराचा विकास दाखवला जातो. प्रत्यक्षात तालुक्याचा विकास झाला आहे का, असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना केला.

शिवतारे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीकडे यावेळी लक्ष वेधले. यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, खासदारांनी केंद्राकडून ईएसआयसी हॉस्पिटल बारामतीसाठी मंजूर करून आणले. वास्तविक त्यासाठी पुरंदर अथवा खेड शिवापूर हे मध्यवर्ती ठिकाण ठरले असते. प्रत्येक विकासाची बाब बारामतीला आणली जात आहे.

दौंड, इंदापूर, भोर, पुरंदरवर त्यातून अन्याय होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रेल्वेची कनेक्टिव्हीटी असलेल्या दौंडमध्ये झाले असते तर मोठ्या प्रमाणावर तेथील विकास झाला असता. परंतु ते होऊ दिले गेले नाही. बारामतीला बसस्थानकासाठी २२० कोटी मिळतात. पंरतु फुरसुंगी, उरुळी देवाची पाणी योजनेसा येथील नेतृत्वाने २५ कोटी मिळू दिले नाहीत. आता-आता सत्तांतरानंतर तो निधी आम्हाला मिळाल्याचे ते म्हणाले.

शरद पवार यांच्याकडे १८ तास काम करण्याची दूरदृष्टी आहे. पण आत्मकेंद्री राजकारणामुळे ते मागे पडले. आमच्या पक्षावर सातत्याने गद्दारीचा आरोप केला जात आहे. खोके सरकार म्हणून संभावना केली जात आहे. मागील निवडणूक भाजप-सेनेला स्पष्ट कौल दिला असताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय स्वाथार्पोटी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे खरे गद्दार कोण हे जनतेला कळाले आहे,असे शिवतारे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या असून सरकार निवडणूकांना भित असल्याच्या टीकेवर ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रवर्गाला आपला अधिकार मिळाला पाहिजे. तो मिळाला की लागलीच निवडणुका होतील, असे देखील शिवतारे यांनी स्पष्ट केले.

...बारामती  मतदारसंघाचे नाव बदलून  ‘पुणे दक्षिण’ कराबारामती लोकसभा मतदारसंघात यापूर्वी नेहमीच नुरा कुस्त्या झाल्या. या मतदारसंघातून लोकसभा लढण्यासाठी यापूर्वीच इच्छूक असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  घेतील. बारामती हे मतदारसंघाचे नाव बदलून ते पुणे दक्षिण असे करावे, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे यावेळी शिवतारे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेVijay Shivtareविजय शिवतारेMaharashtraमहाराष्ट्रBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार