स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच
By Admin | Updated: May 9, 2017 04:10 IST2017-05-09T04:10:29+5:302017-05-09T04:10:29+5:30
स्त्री व्यवसायिक असो, की व्यक्ती तिच्याकडे कायम वेगळ््याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. लोकसंख्येत पन्नास टक्के वाटा असून

स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्त्री व्यवसायिक असो, की व्यक्ती तिच्याकडे कायम वेगळ््याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. लोकसंख्येत पन्नास टक्के वाटा असून, सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी भांडण्याची वेळ येते. अजूनही स्त्री एकटी प्रवास करू शकत नाही, अशा दृष्टीनेच तिला वागविले जाते. अशा मानसिकतेत बदल होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मांडके हिअरिंग्जच्या कल्याणी मांडके यांनी केले.
वसंत व्याख्यानमालेत ‘व्यवसायातील यशस्वी स्त्रियांशी संवाद’ या विषयावर त्यांनी आपली भूमिका मांडली. ज्वेलरी डिझायनर आदिती अत्रे यांनीही आपले मत या वेळी मांडले. आदिती अत्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आईच्या प्रेरणेमुळे एकेदिवशी ज्वेलरी डिझायनर होण्याचे ठरविले. आज जवळपास ३५ देशात मी, डिझाईन केलेले दागिने
जातात.
आव्हानावर मात करीत पुढे गेल्यास आपले पाऊल निश्चितच प्रगतीच्या मार्गावर जाते, यावर विश्वास ठेवून काम केल्याने यश मिळाल्याचे जावडेकर म्हणाल्या.