विद्याथ्र्यानी रोखली एसटी
By Admin | Updated: September 3, 2014 00:38 IST2014-09-03T00:38:34+5:302014-09-03T00:38:34+5:30
रोमनवाडी ते सासवड बस पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही महामंडळाच्या धोरणाविरुद्ध पांडेश्वर (ता. पुरंदर) येथे संतप्त विद्याथ्र्यानी सुमारे तासभर बस रोखून धरली.

विद्याथ्र्यानी रोखली एसटी
जेजुरी : रोमनवाडी ते सासवड बस पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही महामंडळाच्या धोरणाविरुद्ध पांडेश्वर (ता. पुरंदर) येथे संतप्त विद्याथ्र्यानी सुमारे तासभर बस रोखून धरली. एसटीच्या वरिष्ठ अधिका:यांनी विद्याथ्र्यांची मागणी मान्य केल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
रोमनवाडी, पांडेश्वर, जवळाजरुन आदी परिसरातून सासवड-जेजुरी येथे शिक्षण घेण्यासाठी सुमारे 5क् विद्यार्थी, विद्यार्थिनी दररोज एसटीने जातात. या विद्याथ्र्यासाठी सकाळी 7 वाजता जाणारी रोमनवाडी जेजुरी ही एकमेव एसटी बस आहे.
पूर्वी ही बस रोमनवाडी व्हाया जेजुरी ते सासवड अशी जात होती. मात्र, महामंडळाने ती फक्त रोमनवाडी ते जेजुरी अशीच ठेवल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी सासवडला जाणा:या विद्याथ्र्यांचे नुकसान होऊ लागले. रोमनवाडी येथून या विद्याथ्र्याना जेजुरीला यावे लागत आहे. तेथून दुस:या बसने सासवडला जावे लागत होते.
शिवाय त्यासाठी रोमनवाडी ते जेजुरी एक एसटीचा पास, आणि जेजुरी ते सासवड असा दुसरा पास काढावा लागत असल्याने विद्याथ्र्यांना मनस्ताप सहन करावा लागत असे. असे असूनही त्यांना महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही. या संदर्भात विद्याथ्र्यानी सासवड आगरप्रमुखांकडे वारंवार रोमनवाडी ते सासवड अशी पूर्वीसारखीच बससेवा सुरु करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
मागणी मान्य होत नसल्याने, शेवटी काल सकाळी विद्याथ्र्यानी पांडेश्वर येथे चौकातच बस रोखून धरली. विद्याथ्र्यांच्या या आंदोलनात ग्रामस्थही सहभागी झाले होते. एक तर एसटीच्या बस वेळेत येत नाही. शिवाय पास काढूनही विद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत होते. विनंत्या करूनही कोणीच दखल घेत नाही, असे म्हणत विद्याथ्र्यानी आंदोलन केले. विद्याथ्र्याचे आंदोलन बघून पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती माणिक ङोंडे, जेजुरीचे नगरसेवक लालाअण्णा जगताप, पांडेश्वरचे सरपंच पंढरीनाथ सोनवणो, माजी सरपंच संजय जगताप, उत्तम शिंदे आदी ग्रामस्थ तेथे जमा झाले. त्यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिका:यांशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधला. एसटीचे जिल्हा वाहतूक नियंत्रक शेख यांच्याशी संपर्क साधून विद्याथ्र्यांच्या गैरसोयीची माहिती देण्यात आली. त्यांनी त्वरित रोमनवाडी ते सासवड अशी बस सुरू करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)
4पूर्वी ही बस रोमनवाडी व्हाया जेजुरी ते सासवड अशी जात होती. मात्र, ही बससेवा बंद करण्यात आली. महामंडळाने ती फक्त रोमनवाडी ते जेजुरी अशीच ठेवल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी सासवडला जाणा:या विद्याथ्र्यांचे नुकसान होऊ लागले. रोमनवाडी येथून या विद्याथ्र्याना जेजुरीला यावे लागत आहे. तेथून दुस:या बसने सासवडला जावे लागत होते. या मुळे विद्याथ्र्याना नाहक दोन पास काढावे लाग आहे. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतोय. असे असूनही महाविद्यालयात त्यांना वेळेवर पोहचता येत नाही. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.