‘विद्याधाम’ची राष्ट्रीय पातळीवर निवड
By Admin | Updated: December 13, 2014 23:14 IST2014-12-13T23:14:17+5:302014-12-13T23:14:17+5:30
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद राज्यस्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत नैपुण्य मिळवून विद्याधाम प्रशालेने राष्ट्रीय पातळीवर आपली निवड निश्चित केली.

‘विद्याधाम’ची राष्ट्रीय पातळीवर निवड
शिरूर : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद राज्यस्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत नैपुण्य मिळवून विद्याधाम प्रशालेने राष्ट्रीय पातळीवर आपली निवड निश्चित केली. राज्यातील 54 प्रकल्पांपैकी फक्त 26 प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. यात विद्याधाम प्रशालेचा समावेश आहे.
बंगळुरू येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पार होईल. ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवा प्रदूषणाचा सभोवतालच्या परिसरावर होणारा परिणाम अभ्यासणो’ या विषयावरील प्रकल्प विद्याथ्र्यानी स्पर्धेत सादर केला.
यासाठी त्यांनी कारखान्यांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित केली. कारखान्यातून बाहेर पडणारे घटक, त्यांची विल्हेवाट यांवर अधिका:यांशी चर्चा केली. सभोवतालच्या गावात जाऊन ग्रामस्थांशी याबाबत संवाद साधला. प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. ‘एअर सॅम्पलिंग पंपा’द्वारे हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण मोजले. त्याचे अॅनालिसीस प्रयोगशाळेत करून निरीक्षणो नोंदवली. यावर एमआयडीसीतील कारखान्यांतील प्रदूषणाचा सभोवतालच्या मानवी जीवनावर तसेच शेतीवर परिणाम होतो. जैववैविधता धोक्यात आली, काही जाती नष्ट झाल्या आहेत. नागरिकांना श्वसनाचे व त्वचेचे विकार जडल्याचे दिसून आल्याचे निष्कर्ष विद्याथ्र्यानी प्रकल्पाद्वारे सादर केले.
प्रकल्पाचा गटप्रमुख ओंकार, निचित, सिद्धेश, फटांगरे, हृषीकेश ¨शंदे, वृषाली घावटे व क्रांती गायकवाड या सहकारी विद्याथ्र्यानी प्रकल्पाचे सादरीकरण केले. रोहिणी आवटी, सोनाली मिरजकर व अर्चना खंदारे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुभाष वेताळ, उपमुख्याध्यापक अनिल तांबोळी व पर्यवेक्षक गोरख दळवी यांनी विशेष सहकार्य केले.
शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बाफणा, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुकुमार बोरा, सचिव तु. म. परदेशी यांनी विद्याथ्र्याचा सत्कार केला. (वार्ताहर)