शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील इच्छुकांनी सोशल मीडियावर कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 11:37 IST

सध्या अधिकृत फेसबुक पेज, फॅन क्लब पेजेस आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचा पाऊस..

ठळक मुद्देप्रत्यक्ष न भेटताही प्रचार होत असल्याने अनेकांचा भरसोशल मीडियावर आता सकारात्मक प्रचाराला प्राधान्य फेसबुक सजग झाल्याने ‘स्पॉन्सर्स’ पोस्टला मर्यादा

पुणे : विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिनाही शिल्लक नसताना इच्छुकांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यापेक्षा सोशल मीडियावरून जोरदार तयारी सुरु केली आहे. शहरातील प्रमुख पक्षांनी अजून तरी उमेदवारी घोषित केली नसली तरी इच्छुकांनी मात्र सोशल मीडियावर हॅशटॅग भावी आमदार म्हणत प्रचारास सुरुवात केली आहे. २०१४ पासून फक्त प्रत्यक्ष भेटून नाही तर सोशल मीडियावर केलेली प्रसिद्धीही महत्त्वाची ठरलेली दिसून आली होती. तो पॅटर्न महापालिका आणि लोकसभा निवडणुकीत कायम राहिला होता. त्यामुळे सर्वच इच्छुक आधीपासूनच तयारीत आहेत. सध्या अधिकृत फेसबुक पेज, फॅन क्लब पेजेस आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचा पाऊस पडत आहे. त्यातही भाजप आणि राष्ट्रवादी पुढे असून तुलनेने शिवसेना आणि काँग्रेस पाठीमागे आहेत. भाजपमध्ये तर इच्छुकांसोबत पक्ष कार्यालयानेही मतदारसंघांच्या निहाय आठ वॉररूम तयार केल्या आहेत तर काँग्रेस भवनमध्येही सोशल मीडिया टीम कामाला लागली आहे. वैयक्तिक फेसबुक पेजसह कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालवले जाणारे फॅन पेजही लोकप्रिय होत आहेत. केलेली विकासकामे, दैनंदिन भेटीगाठी-कार्यक्रम आणि उपक्रमांच्या पोस्ट अधिकृत पेजवर तर कार्यकर्त्यांमध्ये ‘हवा’ करणाºया पोस्ट फॅन पेजवर पाहायला मिळतात. शिवाय प्रदेश कार्यालयाच्या पोस्ट आणि नेत्यांची लाईव्ह भाषणेही शेअर केली जात आहेत.............सोशल मीडियावर आता सकारात्मक प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. प्रत्यक्षाहून अधिक उत्कट प्रतिमा करण्याकडे भर दिसतो आहे. सकाळी आणि संध्याकाळी पोस्टचे प्रमाण अधिक असून हाच सोशल मीडियाचा 'पिक अवर' असतो. प्रचाराचा पुढचा टप्पा हा आक्रमक स्वरूपाचा त्याचबरोबर आरोप करणारा आणि त्याला उत्तर देणारा असणारा आहे.- सायली नलवडे, पॉलिटिकल कॅम्पेनर, सहस्रजिथ क्रिएशन..........फेसबुक सजग झाल्याने ‘स्पॉन्सर्स’ पोस्टला मर्यादासोशल मीडियावर होणारा अपप्रचार टाळण्यासाठी फेसबुकने लोकसभा निवडणुकीवेळी लागू केलेली नियमावली याही निवडणुकीत लागू आहे. तीन टप्प्यांत केलेल्या व्यक्तीच्या शहानिशानंतर फक्त त्याच व्यक्तीला राजकीय आणि सामाजिक व्यक्तींच्या पोस्ट आणि पेज स्पॉन्सर्ड करता येणार आहे......

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडिया