VIDEO : पुण्यात मध्यरात्री संपली उमेदवार अर्ज छाननी
By Admin | Updated: February 5, 2017 06:33 IST2017-02-05T06:33:48+5:302017-02-05T06:33:48+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 05 - एरवी दोन ते तीन तासांत होणाऱ्या छाननीला शनिवारी अनेक क्षेत्रीय कार्यालयात रात्र उजाडली़. ...

VIDEO : पुण्यात मध्यरात्री संपली उमेदवार अर्ज छाननी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 05 - एरवी दोन ते तीन तासांत होणाऱ्या छाननीला शनिवारी अनेक क्षेत्रीय कार्यालयात रात्र उजाडली़. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात तर मध्यरात्री दोन वाजता उमेदवार अर्ज छाननी पूर्ण झाली.
या ऑफिसमध्ये 3 प्रभागातील 16 ड च्या उमेदवारांची सर्वात शेवटी छाननी झाली. त्यामुळे प्रचार सोडून छाननीसाठी उमेदवारांना रात्री उशिरापर्यंत याठिकाणी थांबण्याची वेळ आली़. मात्र, 14 ड मधील भाजपाच्या ज्योस्ना सरदेशपांडे आणि ज्योस्ना एकबोटे यांना ए व बी फॉर्म दिले असून त्यांच्यापैकी पार्टीचा अधिकृत उमेदवार कोण याचा निर्णय रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास देण्यात येणार आहे.
दरम्यान, घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात शनिवारचा दिवसरात्र उमेदवार अर्जांची छाननी करण्यात गेला. यावेळी या कार्यालयात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
https://www.dailymotion.com/video/x844qfm