Video: तळजाई वन विभागात वनवा भडकला, मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 22:41 IST2021-03-04T22:40:49+5:302021-03-04T22:41:00+5:30
सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वन विभागात आगीचे लोट दिसू लागल्याने काही नागरिकांनी चित्रीकरण करून मित्रांबरोबरच सोशल मीडियावर पाठविले मात्र आग विजविणारी यंत्रणा अग्निशामक केंद्राला कळविण्याची तसदी घेतली नाही.

Video: तळजाई वन विभागात वनवा भडकला, मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक
धनकवडी : तळजाई टेकडीवर पाचगाव पर्वती वन विभागात अचानक पेटलेल्या वनव्याने वन विभागातील वनराई वेगाने जळून खाक होऊ लागली आहे. वन विभागात वाढलेल्या वरदळीमुळे असुरक्षित झालेले वन क्षेत्र या आगीने भस्मसात होण्याच्या मार्गावर आहे.
सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वन विभागात आगीचे लोट दिसू लागल्याने काही नागरिकांनी चित्रीकरण करून मित्रांबरोबरच सोशल मीडियावर पाठविले मात्र आग विजविणारी यंत्रणा अग्निशामक केंद्राला कळविण्याची तसदी घेतली नाही. मात्र तेथील काही पर्यावरण प्रेमी आणि पतीत पावन संघटनेचे विजय क्षीरसागर यांनी अग्निशामक केंद्र आणि माध्यमांना माहिती दिली. दरम्यानच्या काळात आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे शेकडो मोठी झाडे भस्मस्थानी पडली. कात्रज अग्निशमन बंब ला वन विभागात जाण्यासाठी प्रवेशद्वार बंद असल्याचा प्रारंभी अडथळा झाला.
पुणे - सिंहगड कॅालेज जवळच्या डोंगरावर वणवा, अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल, आग वेगाने पसरण्याची भीती #Fire#Punepic.twitter.com/O1Iit0cRL0
— Lokmat (@MiLOKMAT) March 4, 2021
वन विभागात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात आग प्रतिबंधक उपाय योजना केल्या जातात, गवत कापणी, मोकळे पट्टे, स्वच्छता, पालापाचोळ्याची विल्हेवाट या कामाकडे कोव्हीड नंतर दुर्लक्ष झाल्याची लक्षात वर्तविण्यात येत आहे. वरील कामे झाली असती तर हि आग मोठ्या प्रमाणात पसरली नसती असे जाणकारांचे मत आहे. मात्र वन विभागात मद्य पार्ट्या, अन्न झिजविणे असे प्रकार रात्री अनेकदा घडत आहे असे भ्रमणतीला येणारे नागरिक अनेकदा सांगत आहेत. सिगारेट ओढणाऱ्या पाठोपाठ, गांजा ओढणाऱ्यांचा धूर या वन विभागाचा कोळसा करणार का ? असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी अँड. संतोष बाठे यांनी केला आहे. कात्रजचे बंब आणि वन विभागाचे कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न करत होते.