हॉटेलच्या टॉयलेटमध्ये महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:50+5:302021-01-08T04:28:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेलमधील स्वच्छतागृहात महिलांचे एकांत स्थितीत व्हिडिओ चित्रण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ...

Video footage of women in a hotel toilet | हॉटेलच्या टॉयलेटमध्ये महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण

हॉटेलच्या टॉयलेटमध्ये महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हॉटेलमधील स्वच्छतागृहात महिलांचे एकांत स्थितीत व्हिडिओ चित्रण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी हॉटेलच्या वेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हाफिज अन्सारी (वय १८, रा. हॉटेल हॅपी द पंजाब, सुतारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या वेटरचे नाव आहे. ही घटना सुतारवाडी येथील ‘हाॅटेल हॅपी द पंजाब’ येथे सोमवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी एका १८ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी त्यांच्या कुटुंबासह जेवण करण्यासाठी रात्री ‘हॉटेल हॅपी द पंजाब’मध्ये गेल्या होत्या. त्या महिलांच्या स्वच्छतागृहात गेल्या असताना तेथील वेटर त्यांचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत होता. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या वेटरकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना धक्का देऊन तो पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक भागवत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Video footage of women in a hotel toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.