शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Video: लाडक्या लेकीचं 'लय भारी' स्वागत, गावच्या वावरात अवतरलं हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:41 IST

एकीकडे स्त्री भ्रूण हत्येची समस्या असून मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो.

पुणे - मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी, त्यामुळेच मुलीच्या जन्माचे स्वागतही लक्ष्मीच्या आगमानाप्रमाणे काही कुटुंबात करण्यात येते. त्यातच, घरात अनेक वर्षानंतर किंवा पहल्यांदाच मुलगी जन्माला आली असल्यास कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरत नाही. पुण्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यापूर्वी आपण नवरीची पाठवणी हेलिकॉप्टरमध्ये केल्याचं पाहिलं. पण, चक्क स्त्रीजन्माचे स्वागत हेलिकॉप्टरने केल्याने झरेकर कुटंबीय चर्चेचा विषय ठरलं आहे.  

एकीकडे स्त्री भ्रूण हत्येची समस्या असून मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो. परंतु, झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा, मुलगी हीच घरची लक्ष्मी मानत तिच्या जन्माचे जंगी स्वागत केले आहे. या स्वागताने गावातील सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलीचं नावही राजलक्ष्मी असे ठेवले आहे.

22 जानेवारी रोजी भोसरी येथे मुलीच्या आईच्या घरी झाला तिचा जन्म झाला. मात्र, बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले. "आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीचे स्वागत विशेष करण्यासाठी आम्ही 1 लाख रुपयांच्या चॉपर राइडची व्यवस्था केल्याचं,” मुलीचे वडिल विशाल झरेकर यांनी सांगितलं. विशाल हे व्यवसायाने वकील आहेत.  

"आमच्या घरात खूप दिवसांनी मुलीचा जन्म झाला आणि त्यामुळे अत्यंत आनंद झाला आहे. म्हणून मी आणि माझ्या पत्नीने, लेक राजलक्ष्मीला 2 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरने घरी आणले. आम्ही देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जेजुरीला गेलो. पण, तेथे हेलिकॉप्टर नेण्यास परवानगी नसल्याने, आम्ही आकाशातून प्रार्थना केली," असेही विशाल यांनी सांगितले.  गावात हेलिकॉप्टरचे आगमन होताच ग्रामस्थांनी पाहायला गर्दी केली होती. तर, स्त्रीजन्माचे असे अनोख्या पद्धतीने झालेलं स्वागत पाहून गावकरी भारावून गेले. विशेष म्हणजे गुलाब फुलांच्या पाखळ्यांनी तिचं घरात स्वागत करण्यात आलं. यावेळी, मिठाईही वाटून आनंद साजरा केला. 

टॅग्स :PuneपुणेHelicopter Eelaहेलिकॉप्टर ईला