शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

VIDEO: "खंड्याला विसरूच शकत नाही...", शेतकऱ्याची 'खंड्या'बद्दल अशीही कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 16:23 IST

पंचक्रोशीत मानसन्मान मिळवून देणाऱ्या खंडाच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकाने जे केलं ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले...

- किरण शिंदे

पुणे :पुणे जिल्ह्यातील मावळ परिसर, बैलगाडा प्रेमींनी मैदान खचाखच भरलं होतं. खंड्या आणि वजीर नेहमीप्रमाणे मैदान मारण्यासाठी सज्ज होते. सर्वांच्या नजरा बैलगाडीवर रोखल्या होत्या. शर्यत कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच होती आणि झेंडा पडला. खंड्या आणि वजीर जिवाच्या आकांताने धावत होते. काही सेकंदातच या जोडीने शर्यत पूर्ण केली. खंड्या नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा घाटाचा राजा ठरला. बैलगाडा मालक आनंद साजरा करत होते आणि इतक्यात ती दुर्दैवी घटना घडली. हृदयविकाराचा झटका आल्याने खंड्या कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पंचक्रोशीत मानसन्मान मिळवून देणाऱ्या खंडाच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकाने जे केलं ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

बैलगाडा मालक राहुल जाधव यांनी आठ महिन्याचा असताना खंड्याला आणले होते. त्यानंतर पाच वर्ष त्याचा घरातील सदस्याप्रमाणे त्याचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण जाधव कुटुंबीयावर शोककळा पसरली होती. खंड्याला शेवटचा निरोप देताना जाधव कुटुंबीयांनी आपल्या घराशेजारीच त्याचा दफनविधी केला. त्यानंतर दहावा विधी आणि उत्तरकार्य देखील केले. इतकच नाही तर घराशेजारीच खंड्या बैलाची समाधी उभारून त्याने केलेल्या उपकाराची परतफेड केली.

बैलगाडा शर्यतीत खंड्याने अनेक विक्रम केले होते. पुणे जिल्ह्यात ६५ हून अधिक शर्यती जिंकल्या होत्या. महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा म्हणूनही त्याने नावलौकिक मिळवला होता. आयुष्याची शेवटची शर्यतीतही तो राजाच ठरला. आपल्या मालकाचा नावलौकिक त्यानं शेवटच्या शर्यतीतही वाढवला. स्वतः मात्र मरणाच्या दारात गेला. मालकाने सुद्धा खंड्या कायमस्वरूपी स्मरणात राहील अशाच प्रकारे त्याला शेवटचा निरोप दिला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र