शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video : भवानी पेठेत प्लॉस्टिकच्या कारखान्याला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 20:14 IST

भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ हा रबर आणि प्लॉस्टिक मोडिंगचा छोटा कारखाना आहे़. या कारखान्याला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मिळाली़ मध्य वस्तीतील गजबजलेला परिसर लक्षात घेऊन अग्निशामक दलाने  तातडीने १० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ३ पाण्याचे टँकर घटनास्थळी पोचले होते. 

पुणे - भवानी पेठेतील प्लॉस्टिकच्या कारखान्याला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले. कारखान्यात रबर आणि प्लॉस्टिकचे साहित्य असल्याने आगीने वेगाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. त्याच्या ज्वाळा लांबवरुन दिसून येत असल्याने या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले़ 

भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ हा रबर आणि प्लॉस्टिक मोडिंगचा छोटा कारखाना आहे़. या कारखान्याला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मिळाली़ मध्य वस्तीतील गजबजलेला परिसर लक्षात घेऊन अग्निशामक दलाने  तातडीने १० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ३ पाण्याचे टँकर घटनास्थळी पोचले होते. अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह प्रमुख अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी कर्मचाऱ्यांनी सहकार्याने ही आग दीड तासाच्या प्रयत्नांनंतर विझविण्यात यश मिळविले. या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही़. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीच्या ज्वाळा लांबवरुन दिसत होत्या़. आग आपल्या घरापर्यंत येईल, या भीतीने जवळ राहणाऱ्या नागरिकांची आपल्या घरातील हाताला लागेल ते साहित्य बाहेर काढून लांबवर ठेवण्यासाठी एकच धावपळ सुरु होती़.

टॅग्स :Puneपुणेfireआग