VIDEO- उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून दिले 5 हजारांचे चिल्लर

By Admin | Updated: February 2, 2017 16:27 IST2017-02-02T15:07:03+5:302017-02-02T16:27:34+5:30

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 2-  निवडणुकीचा खर्च म्हणून मतदारांकडून पैसे जमा करण्याचा प्रकार काही राजकारणी करत असतात. प्रभाग क्रमांक ...

VIDEO - 5 thousand rupees given by the candidate for the deposit amount | VIDEO- उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून दिले 5 हजारांचे चिल्लर

VIDEO- उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून दिले 5 हजारांचे चिल्लर

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 2-  निवडणुकीचा खर्च म्हणून मतदारांकडून पैसे जमा करण्याचा प्रकार काही राजकारणी करत असतात. प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी येथील धनंजय जाधव यांनी त्याही पुढचे पाऊल टाकले आहे. उमेदवारी अर्जाची अनामत रक्कमच त्यांनी मतदारांकडून जमा केली. नाण्यांच्या स्वरूपात जमा झालेली ही तब्बल 5 हजार रूपयांची रक्कम त्यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे चिल्लरच्या स्वरूपातच जमा केली. येरवडा क्षेत्रीय कार्यालयात हा प्रकार घडला.
 
घरातील परातीमधून त्यांनी ही सगळी चिल्लर क्षेत्रीय कार्यालयात आणली. त्यांच्यासमवेत बरेच कार्यकर्ते होते. अर्ज दाखल करताना अनामत रक्कम म्हणून त्यांनी चिल्लर निवडणूक निर्णय अधिका-यांसमोर ठेवली. 1 रूपया ते 10 रूपयांपर्यंतच्या नाण्यांचा यात समावेश होता. निवडणूक निर्णय अधिका-यांनी ही सगळी चिल्लर कर्मचा-यांना मोजायला लागली.
 
https://www.dailymotion.com/video/x844q9y

Web Title: VIDEO - 5 thousand rupees given by the candidate for the deposit amount