पीवायसी हिंदू जिमखाना ब, २२ यार्ड्स संघांचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST2021-02-26T04:13:18+5:302021-02-26T04:13:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक १२ ...

Victory of PYC Hindu Gymkhana B, 22 Yards | पीवायसी हिंदू जिमखाना ब, २२ यार्ड्स संघांचे विजय

पीवायसी हिंदू जिमखाना ब, २२ यार्ड्स संघांचे विजय

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना ब, २२ यार्ड्स या संघांनी प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आगेकूच केली.

भूगाव येथील द पूना वेस्टर्न क्लब मैदानावर गुरुवारी (दि. २५) सुरू झालेल्या या स्पर्धेत हर्षल भांडारकरच्या (५-१२) भेदक गोलंदाजीच्या जोरावर २२ यार्ड्स संघाने एच.के.पीडब्लूसी संघाचा ९५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना २२ यार्ड्स संघाने २५ षटकांत ७ बाद १४७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना एच.के.पीडब्लूसी संघाचा डाव १६.३ षटकांत ५२ धावांवर आटोपला. दुसऱ्या सामन्यात वीर कारखानीसच्या (२-१८) गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना ब संघाने द स्पोर्ट्स पार्क संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : साखळी फेरी :

२२ यार्ड्स : २५ षटकांत ७ बाद १४७ धावा, सिद्धांत रिकामे नाबाद ४३, नील २४, ओम मालसरे २-२०, अद्वैत जे. २-२८ वि.वि. एच.के.पीडब्लूसी : १६.३ षटकात सर्वबाद ५२ धावा, गंधर्व साळुंके १४, हर्षल भांडारकर ५-१२, क्षितिज सोनार २-११; सामनावीर - हर्षल भांडारकर; २२ यार्ड्स संघ ९५ धावांनी विजयी;

द स्पोर्ट्स पार्क : २० षटकांत ६ बाद १०२ धावा, अभिनव केंगर ३०, आलोक लोढा १३, शौर्य पाटील १२, वीर कारखानीस २-१८, असीम देवगावकर १-९ पराभूत वि. पीवायसी हिंदू जिमखाना ब : १४ षटकात ३ बाद १०३ धावा, साई बोऱ्हाडे नाबाद ३३, श्लोक जोशी ३०, विभास १-३; सामनावीर - वीर कारखानीस; पीवायसी हिंदू जिमखाना ब संघ ७ गडी राखून विजयी.

Web Title: Victory of PYC Hindu Gymkhana B, 22 Yards